Gold Silver Price 1 October : आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोमवारच्या ९०२३८ रुपयांच्या बंद भावाच्या तुलनेत चांदी आज ९०७५८ रुपये प्रति किलोग्रॅमवर उघडली. आयबीजेएच्या दरानुसार आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ७५७९७ रुपयांवर पोहोचला आहे. सोनं आणि चांदीचे हे दर आयबीजेएने जाहीर केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेस नाहीत. आपल्या शहरातील सोन्या-चांदीच्या दरात १००० ते २००० चा फरक असण्याची शक्यता आहे.
१४ ते २३ कॅरेट सोन्याचा दर
आज २३ कॅरेट सोन्याचा भाव १९९ रुपयांनी वाढून ७५०९५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १८३ रुपयांनी वाढून ६९०६४ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. आज १८ कॅरेट सोन्याचा भाव १५० रुपयांनी वाढला असून तो ५६५४८ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं उघडला. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव ११७ रुपयांनी वधारून ४४१०७ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय.
जीएसटीसह सोन्या-चांदीचा दर
जीएसटीमुळे २४ कॅरेट सोन्याचा भाव आता ७७६५८ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचला आहे. यामध्ये २२६१ रुपये जीएसटीचा समावेश आहे. तर जीएसटीसह २३ कॅरेट सोन्याची किंमत ७७३४७ रुपये आहे. ३ टक्के जीएसटीनुसार यात २२५२ रुपयांची भर पडली आहे. २२ कॅरेट सोन्याच्या दराबद्दल बोलायचं झालं तर आज ते जीएसटीसह ७११३५ रुपयांवर पोहोचलं आहे. यात जीएसटी म्हणून २०७१ रुपयांची भर पडलीये.
१८ कॅरेट सोन्याचा भाव आता १६९६ रुपये जीएसटीसह ५८२४४ रुपये झाला आहे. त्यावर ज्वेलरी मेकिंग चार्ज आणि ज्वेलर्सच्या नफ्याचा समावेश नाही. जीएसटीसह एक किलो चांदीचा भाव ९२९४५ रुपयांवर पोहोचलाय.