Join us

आयपीओपूर्वी Ola Electric नं केला मोठा बदल, नावही बदललं; जाणून घ्या माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 6:17 PM

इलेक्ट्रिक वाहन कंपनी ओला इलेक्ट्रिक लवकरच आयपीओ लॉन्च करून शेअर बाजारात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.

Ola Electric IPO Details: इलेक्ट्रिक वाहन कंपनी ओला इलेक्ट्रिक लवकरच आयपीओ लॉन्च करून शेअर बाजारात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी कंपनीनं जोरदार तयारी सुरू केली आहे. आयपीओ लाँच करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून, कंपनीनं आता एक मोठा बदल केलाय. या बदलानंतर ओला इलेक्ट्रिक ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी राहिली नसून ती पब्लिक लिमिटेड कंपनीत बदलली आहे.ओला इलेक्ट्रिकनं स्वत: शेअर बाजारांना प्रायव्हेट लिमिटेडमधून पब्लिक लिमिटेड कंपनीत बदल करण्याबाबत माहिती दिली. याशिवाय कंपनीनं आणखी एक मोठा बदल केलाय. आता ओला इलेक्ट्रिकचे अधिकृत नावही बदलण्यात आलंय. पूर्वी कंपनीचं नाव ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड होतं, आता कंपनीचं नाव बदलून ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड करण्यात आलंय.ओला इलेक्ट्रिकचं वर्चस्वओलानं राइड हेलिंग अॅप चालवणारी कंपनी म्हणून सुरुवात केली. मात्र, आता कंपनीचं स्वरूप बरंच बदललं आहे. ओला इलेक्ट्रिक ही तिच्या उपकंपन्यांपैकी एक आहे, ज्याची गणना देशांतर्गत सर्वात मोठ्या ईव्ही कंपन्यांमध्ये केली जाते. जर आपण भारताच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बाजारपेठेवर नजर टाकली तर सध्या ओला इलेक्ट्रिकचंच वर्चस्व आहे.

डीआरएचपी सादर होणार?रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, ओला इलेक्ट्रिक आपल्या प्रस्तावित आयपीओ बाबतचा मसुदा म्हणजेच डीआरएचपी या महिन्यात बाजार नियामक सेबीकडे सादर करू शकते. कंपनी सध्या मसुद्यावर काम करत आहे. कंपनी आपल्या मंडळाची पुनर्रचनाही करत आहे. बोर्डात एअरटेलचे माजी सीईओ मनोज कोहली, मेन्सा ब्रँड्सचे संस्थापक अनंत नारायण आणि युअरस्टोरीच्या सह-संस्थापक श्रद्धा शर्मा यांचाही समावेश करण्यात आलाय.मार्च २०२४ पर्यंत आयपीओ?आयपीओच्या तारखांबद्दल बोलायचं झालं तर असं सांगितलं जात आहे की कंपनीचा आयपीओ पुढील तिमाहीत लॉन्च केला जाऊ शकतो. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कंपनी मार्चमध्ये आयपीओ लॉन्च करू शकते. दरम्यान, ओला इलेक्ट्रिक आयपीओमध्ये मध्ये ७ ते ८ अब्ज डॉलर्सचे मूल्यांकन मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं ईटीच्या एका वृत्तात सूत्रांच्या हवाल्यानं नमूद करण्यात आलंय.

टॅग्स :ओलाइलेक्ट्रिक कार / स्कूटरइनिशिअल पब्लिक ऑफरिंग