नवी दिल्ली : परदेशातील बाजारात कमी उठाव आणि स्थानिक बाजारात सराफा आणि व्यापारी यांच्याकडून कमी मागणी यामुळे मंगळवारी सोने २३0 रुपयांनी घसरून २९,८२0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. सोन्याप्रमाणेच चांदीही १६0 रुपयांनी घसरून ४१,१00 रुपये प्रतिकिलो झाली.
स्थानिक बाजार विश्लेषकांनी सांगितले की, मंगळवारी परदेशी बाजारात सोन्याची कमी मागणी होती. त्याचा परिणाम भारतातही झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंगापूर येथे सोने 0.0४ टक्क्यांनी घसरून १२७३.५0 डॉलर प्रति औंस झाले.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ या दोन्ही शुद्धतेच्या सोन्याचे भाव २३0 रुपयांनी घसरून अनुक्रमे २९,८२0 रुपये प्रति १0 ग्रॅम आणि २९,६७0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. सोमवारी सोने २५ रुपयांनी वधारले होते. चांदीच्या नाण्याचे भावही स्थिर राहिले.
सोने ३0 हजारांच्या खाली
परदेशातील बाजारात कमी उठाव आणि स्थानिक बाजारात सराफा आणि व्यापारी यांच्याकडून कमी मागणी
By admin | Published: May 18, 2016 05:46 AM2016-05-18T05:46:41+5:302016-05-18T05:46:41+5:30