- उमेश शर्मा
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कोरोना व्हायरसमुळे प्रत्येकजण काळजी घेतना दिसत आहे. अडचणीपासून बचाव करण्यासाठीकरदात्यांनी ३१ मार्च २०२० अगोदर काय काळजी घ्यायला हवी?
कृष्ण (काल्पनिक पात्र) : कोरोनापासून बचाव करण्यासाठी लोक पुरेशी काळजी करीत आहेत. करदात्यांनी वर्षाच्या शेवटी करदात्याचे अनुसरन करताना काळजी घ्यायला हवी. हिशेबाच्या पुस्तकांची देखरेख करावी. अगाऊ करनियोजन जास्त फायदेशीर असेल. उशीर झाल्यास करदात्यांना त्रासाला सामोरे जावे लागू शकेल.
अर्जुन : प्राप्तिकराच्या दृष्टीने आर्थिक वर्षाच्या शेवटी करदात्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे ?
कृष्ण : अर्जुना, करदात्याने प्राप्तिकराच्या दृष्टीने पुढील गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे.
करदात्याने जर १५ मार्च पर्यंत अगाऊ कर भरला नसेल, तर ३१ मार्चपूर्वी भरावा. त्यामुळे त्यावर कमी व्याज आकारले जाईल. मागील वर्षाची व या वर्षाचा अंदाजित नफा तोटा काढून निर्णय घ्यावा.
प्राप्तिकराच्या कलम ८० नुसार वजावट मिळवायची असल्यास करदात्याने उत्पन्न व त्यावरील करदायित्व याच्या अंदाजानुसार ३१ मार्चच्या आधी गुंतवणूक करावी.
वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांनी केलेल्या गुंतवणुकीची व कपातीची माहिती मालकांना द्यावी म्हणजे मार्च महिन्यात कमी टीडीएस वजा केला जाईल.
प्रत्येक करदात्याने फॉर्म २६ एसमधे नमूद केलेल्या उत्पन्नाची पडताळणी करावी आणि जर त्यात काही मतभेद आढळल्यास सुधारणा करावी.
२०२९-२० या वर्षात केलेल्या सर्व खर्चावर टीडीएस कपात करून जमा करावा. अन्यथा खर्चाच्या ३० टक्के खर्च ग्राह्य धरला जाणार नाही.
आर्थिक वर्ष २०१८-१९मधे बिलेटेड परतावा दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२० आहे. तसेच, बिलेटेड परताव्यासाठी १० हजार अधिक शुल्क आकारले जाईल.
प्राप्तिकर परतावा भरण्यासाठी पॅनधारकांना आता आधार-पॅन जोडणे बंधनकारक आहे. आधार आणि पॅन जोडण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२० आहे.
अर्जुन : कृष्णा, कोणत्या मुद्द्यावर करदात्याला आर्थिक वर्षाच्या शेवटी वस्तू आणि सेवा करावर लक्ष द्यावे लागते?
कृष्ण : जे निर्यातदार कर न भरता निर्यात करत असेल तर, लेटर आॅफ अंडरटेकिंग घेऊन निर्यात करतात.त्यांनी आर्थिक वर्ष २०२०-२१साठी अर्ज करावा. २) करदात्याने आर्थिक वर्ष २०२०-२१साठी अभ्यास करून ठरवावे की त्याला कंपोझिशन स्कीमचा पर्याय निवडावा की नाही. ३) करदात्याने त्याचे खातेपुस्तक आणि परतावा याचा समेट करुन जरुरी त्या सुधारणा शक्यतो मार्च २०२० च्या पतराव्यात कराव्या. ४) करदात्याने त्याचे इनपूट टॅक्स क्रेडिट जे २ए-मधे आाहे, ३ बी मध्ये आहे आणि खातेपुस्तकात आहे, त्याचा समेट करावा. तसेच, पुरवठादाराला देखील त्याचा पाठपुरावा करावा. ५) जीएसटी पोर्टलवर दिसणारे टीडीएसचे क्रेडिट मासिक तत्त्वावर स्वीकारावे, आर्थिक वर्ष २०२०-२१ची नवीन क्लिंग मालिका १ एप्रिल २०२० पासून सुरू करावी, ७) जीएसटी कौन्सिलच्या १४ मार्च २०२०च्या मिटिंगनुसार वर्ष २०१८-१९चे जीएसटी आॅडिट व वार्षिक परतावा भरण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२० ऐवजी ३० जून २०२० केली आहे.