नवी दिल्ली : जगात सर्वाधिक श्रीमंत असण्याचा मान स्पेसएक्स, टेस्ला व एक्स या कंपन्यांचे प्रमुख इलॉन मस्क यांच्याकडून आता हिरावला गेला आहे. फ्रान्समधील अब्जाधीश बर्नार्ड अर्नोल्ट यांनी एकूण संपत्तीच्या बाबतीत मस्क यांना मागे टाकले आहे. टेस्ला या कंपनीच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाल्याने मस्क यांच्या एकूण संपत्तीत घट झाली आहे. (वृत्तसंस्था)
- फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार अर्नोल्ट यांच्याकडे १७.२० लाख कोटी इतकी संपत्ती आहे.
- सर्वात श्रीमंत १० व्यक्तींमध्ये भारतातील एकाही उद्योगपतीला जागा मिळवता आलेली नाही.
- रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी ८.६४ लाख कोटींसह ११ व्या स्थानी तर अदानी समूहाचे गौतम अदानी ६.२३ लाख कोटी रुपयांसह १६ व्या स्थानी आहेत.