Join us  

बेस्ट 150 Mbps ब्रॉडबँड प्लॅन; मिळणार 2000GB, फ्री कॉल्स, OTT बेनिफिट्स आणि डिस्काऊंट; पाहा प्लॅन 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 4:18 PM

Best Broadband Plan : सध्या अनेक जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. तसंच घरातल्या अन्य कामांसाठीही आपल्याला मोठ्या प्रमाणात इंटरनेटची गरज भासत आहे.

Best Broadand Plan : सध्या अनेक जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. तसंच घरातल्या अन्य कामांसाठीही आपल्याला मोठ्या प्रमाणात इंटरनेटची गरज भासतेय. भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आपल्या ग्राहकांना 150 Mbps ब्रॉडबँड प्लॅन ऑफर करत आहे. प्लॅनमध्ये अनेक उत्तम फायदे उपलब्ध आहेत. सध्या, फिक्स्ड लाइन सर्व्हिस मार्केटमध्ये जिओ आणि एअरटेलचे वर्चस्व असलं तरी बीएसएनएल अजूनही बाजारपेठेतील सर्वात मोठ्या प्लेअर पैकी एक आहे.

जर तुम्ही 150 Mbps ब्रॉडबँड प्लॅन पाहत असाल, तर बरेच जण तुम्हाला JioFiber निवडण्यासाठी सुचवू शकतात. परंतु तुम्ही BSNL चा 150 Mbps ब्रॉडबँड प्लॅन देखील एकदा पाहू शकता. BSNL च्या या प्लानचे नाव SuperStar PremiumPlus असं आहे आणि त्याची किंमत 999 रुपये प्रति महिना आहे. BSNL च्या या 150 Mbps ब्रॉडबँड प्लॅनची ​​किंमत 999 रुपये प्रति महिना आहे, म्हणजेच दररोज तुम्हाला केवळ 33 रुपयांमध्ये हा प्लॅन मिळणार आहे. हा प्लॅन 2TB (म्हणजे 2000GB) मासिक डेटा लिमिटसह येतो. डेटा लिमिट वापरल्यानंतर ग्राहकांना 10 एमबीपीएसचा स्पीड देण्यात येतो. 

अन्य बेनिफिट्सहीयाशिवाय, बीएसएनएल अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसह कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय विनामूल्य लँडलाइन कनेक्शन ऑफर करते. यामध्ये ग्राहकांना अन्य बेनिफिट्सही देण्यात येत आहेत. यामध्ये ग्राहकांना Disney+ Hotstar, ShemarooMe, Lionsgate, Hungama, SonyLIV, ZEE5, Voot आणि YuppTV सारख्या काही ओटीटी प्लॅटफॉर्म्सचं सबस्क्रिप्शनही मिळतं.

पहिल्या बिलावर ९० टक्के डिस्काऊंटयाव्यतिरिक्त, ग्राहकांनी नवीन कनेक्शन खरेदी केल्यावर त्यांनापहिल्या महिन्याच्या बिलावर 500 रुपयांपर्यंत 90 टक्के सूट मिळते. ग्राहकांसाठी हा एक व्हॅल्यू फॉर मनी प्लॅन आहे. JioFiber सेवा तुमच्या परिसरात उपलब्ध नसल्यास तुम्हाला हाय-स्पीड प्लॅन हवा असेल तर ही BSNL चा हा प्लॅन तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो.

टॅग्स :बीएसएनएलरिलायन्स जिओएअरटेल