Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुंतवणुकीचा उत्तम आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध; Fixed Deposit करणे फायद्याचे ठरते का? 

गुंतवणुकीचा उत्तम आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध; Fixed Deposit करणे फायद्याचे ठरते का? 

बँकेतील सेव्हिंग अकाऊंटवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा फिक्स्ड डिपॉझिटवर जास्त व्याज मिळते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 06:59 AM2021-07-27T06:59:01+5:302021-07-27T06:59:32+5:30

बँकेतील सेव्हिंग अकाऊंटवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा फिक्स्ड डिपॉझिटवर जास्त व्याज मिळते.

The best and safest investment option available; Is Fixed Deposit Beneficial? | गुंतवणुकीचा उत्तम आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध; Fixed Deposit करणे फायद्याचे ठरते का? 

गुंतवणुकीचा उत्तम आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध; Fixed Deposit करणे फायद्याचे ठरते का? 

आपण मेहनतीने जमा केलेली पूँजी अशीच खर्च होऊ नये, ती सुरक्षित रहावी असे वाटत असेल आणि कोणतीही जोखीम पत्करण्याची इच्छा नसेल तर गुंतवणूकदारांसाठी मुदत ठेव अर्थात फिक्स्ड डिपॉझिट हा गुंतवणुकीचा उत्तम आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध आहे. 

गुंतवणुकीची रक्कम व मुदत

  • फिक्स्ड डिपॉझिटमध्ये किमान व कमाल रक्कम बँकेनिहाय वेगवेगळी असू शकते. 
  • काही बँका कमीत कमी १०० रुपयांपासून गुंतवणुकीची सुविधा देतात. फिक्स्ड डिपॉझिटमध्ये कमाल कितीही रक्कम गुंतवता येऊ शकते. 
  • मुदत ठेवीची रक्कम किती आहे त्यावर व्याजाचा दर ठरतो. करबचतीसाठी फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवलेल्या रकमेचा कालावधी ५ ते १० वर्षे असतो. 
  • बँकेतील सेव्हिंग अकाऊंटवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा फिक्स्ड डिपॉझिटवर जास्त व्याज मिळते. साधारणत: ३.५ ते ९ टक्क्यांपर्यंत व्याजदर आहे.

फिक्स्ड डिपॉझिट का गरजेचे?

  • ७ दिवस ते १० वर्षे या कालावधीसाठी फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवता येतात.
  • शेअर बाजारात कितीही चढउतार झाले किंवा काहीही खळबळ उडाली तरी फिक्स्ड डिपॉझिटवर त्याचा परिणाम होत नाही. 
  • फिक्स्ड डिपॉझिटवर बँकेद्वारा निश्चित करण्यात आलेले व्याज गुंतवणूकदारांना मिळतेच.

 

फिक्स्ड डिपॉझिटवर कर्जाची सुविधा

मुदत ठेवीच्या रकमेवर कर्ज मिळण्याची सुविधाही उपलब्ध आहे. अचानक पैशांची गरज भासली तर एफडी न तोडता त्यावर कर्ज घेता येऊ शकते.  साधारणत: मुदत ठेव रकमेच्या ९० टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकते.  

आणीबाणीच्या परिस्थितीत पैसे काढता येतात

एखाद्या प्रसंगात अचानक पैशांची गरज भासली तर फिक्स्ड डिपॉझिटमधली काही रक्कम काढता येते. मुदत ठेव पूर्ण होण्यापूर्वी त्यातून रक्कम काढल्यास बँका त्यावर शुल्क आकारणी करतात. बँकनिहाय ही आकारणी भिन्न असू शकते. एफडीवर क्रेडिट कार्डही मिळू शकते. 

 

Web Title: The best and safest investment option available; Is Fixed Deposit Beneficial?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.