Join us

Best Broadband Plan: 'ही' कंपनी २७५ ₹ मध्ये देतेय ३३०० जीबी डेटा; ७५ दिवसांचं फ्री कॉलिंग, जाणून घ्या प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 6:03 PM

Best Broadband Plan: ही कंपनी बड्या कंपन्यांना मोठी टक्कर देत आहे. तसंच कमी किंमतीत ग्राहकांना मोठे बेनिफिट्सही देण्यात येत आहेत.

Best Broadband Plan: सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने (BSNL) वातंत्र्य दिनानिमित्त प्रमोशनल इंडिपेंडन्स डे ऑफर अंतर्गत तीन ब्रॉडबँड प्लॅन्स सादर केले होते. यामध्ये 275 रुपयांच्या दोन प्लॅनचा समावेश आहे, तर 775 रुपयांच्या एका प्लॅनचा समावेश आहे. या तीन प्लॅन्सची अंतिम मुदत 15 नोव्हेंबर होती, ती आता वाढवून 15 डिसेंबर करण्यात आली आहे. 15 डिसेंबरपर्यंत तुम्ही यापैकी कोणताही प्लॅन निवडल्यास तुम्हाला बंपर इंटरनेट आणि फ्री कॉलिंग सारखे फायदे मिळतील. स्वातंत्र्य दिनाच्या ऑफर अंतर्गत, आधीपासून सुरू असलेल्या प्लॅन्सच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. जाणून घेऊया याच प्लॅन्सबद्दल.

प्रमोशनल इंडिपेंडन्स डे ऑफर अंतर्गत, BSNL 449 आणि 599 रुपयांचे प्लॅन्स 275 मध्ये ऑफर करत आहे. याचा अर्थ ग्राहकांना 449 आणि 599 चे ब्रॉडबँड प्लॅन 275 रुपयांमध्ये मध्ये मिळणार आहेत. या दोन्ही प्लॅनची ​​वैधता 75 दिवसांची आहे. त्याच वेळी 999 रुपयांचा प्लॅन 775 रुपयांमध्ये ऑफर करण्यात आला आहे. बीएसएनएलच्या नवीन ग्राहकांना केवायसी दरम्यान तीनपैकी कोणताही प्लॅन निवडावा लागेल.

775 रुपयांचा प्लॅनबीएसएनएलच्या 775 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना बंपर डेटाचा फायदा मिळेल. ग्राहकांना एकूण 2TB इंटरनेट वापरण्याची संधी मिळेल. या ऑफर अंतर्गत इंटरनेट स्पीड 150 Mbps असेल. तथापि, 2TB डेटा वापरल्यानंतर, वेग कमी होऊन 10Mbps होईल. या प्लॅनची ​​वैधता 75 दिवसांची आहे. यादरम्यान, मोफत कॉल्सव्यतिरिक्त, ग्राहकांना Voot, YuppTV, ZEE5, Disney+ Hotstar, SonyLIV सारख्या OTT प्लॅटफॉर्मचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळेल.

275 रुपयांचा प्लॅनBSNL ने 275 रुपयांचे दोन प्लॅन्स सादर केले आहेत. पहिल्या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर त्यात 3300GB डेटा मिळेल, ज्याचा स्पीड 30Mbps असेल. याशिवाय मोफत कॉलची सुविधाही मिळणार आहे. या प्लॅनची ​​वैधता 75 दिवसांची आहे. दुसऱ्या प्लॅनची ​​वैधता देखील 75 दिवसांसाठी असेल. यामध्ये तुम्हाला फ्री कॉल्स आणि 3300 GB डेटाचाही लाभ मिळेल. परंतु या प्लॅनमध्ये 60Mbps चा इंटरनेट स्पीड असेल. ग्राहकांना ऑनलाइन किंवा नजीकच्या बीएसएनएलच्या कार्यालयात जाऊनही या प्लॅन्सचा लाभ घेता येईल.

टॅग्स :बीएसएनएलइंटरनेट