जर तुम्ही नोकरी करून कंटाळले असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. तुम्हाला तर नोकरी न करता एखादा व्यवसाय करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरू शकते. कारण आज आम्ही तुम्हाला सरकारचा असा प्लान सांगणार आहोत त्याच्या माध्यमातून तुम्ही वर्षाला ५० लाखांपर्यत उत्पन्न घेऊ मिळवू शकता. तसंच हे पैसे कमावण्यासाठी केंद्र सरकार तुमची मदत करणार आहे. यासाठी तुम्हाला सरकारकडून ८० टक्के कर्ज उपलब्ध होऊ शकतं. चला तर मग जाणून घेऊया या व्यवसायाबद्दल.
सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्ती हा आपल्या फिटनेसबद्दल जागरूक असतो. त्यामुळे फिटनेस आणि त्याचाशी निगडीत बाजारपेठ आणि त्या संबंधीत गोष्टी या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. या सबंधी एक व्यवसाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सोयामिल्क तयार करण्याचा व्यवसाय सुरू करून तुम्ही जास्त पैसे कमवू शकता. नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन (NSIC) ने इन्क्यूबेशन प्रोग्रामध्ये सुद्धा या उद्योगाचा समावेश करण्यात आला आहे.
करावा लागणारा खर्च
एनएसआईसी च्या प्रोजेक्ट रिपोर्टनुसार सोया मिल्क मेकिंग यूनिटची संपूर्ण किंमत ११ लाख रूपये इतकी आहे. ज्यासाठी तुम्हाला बँकेतून मुद्रा लोन उपलब्ध करून दिलं जाईल. तसंच गुंतवत असलेल्या रमकेच्या ८० टक्के रक्कम तुम्हाला कर्जाच्या माध्यामातून दिली जाईल. यासाठी तुम्हाला दिड लाख स्वतःचे वापरावे लागणार आहेत.
अशी असेल मिळकत
या प्रकल्पाअंतर्गत तुम्ही वर्षाला १ लाख ७५ हजार लिटर सोया मिल्क तयार करू शकता. एक लिटर दुध ३० रूपयांना मिळतं. म्हणचेच संपूर्ण विक्री ५२ लाख ५० हजार रुपयांची होईल. सगळा लागणारा खर्च व्यवस्थित कव्हर करून तुम्ही या व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेऊ शकता. या व्यवसायातून वर्षाला ५० लाख रूपये उत्पन्न घेऊ शकता. या व्यवसायासाठी तुम्हाला एनएसआईसीकडून ट्रेनिंग देण्यात येणार आहे. एनएसआईसी च्या टेक्निकल सर्विस सेंटर मधून तुम्हाला जॉबचं सुद्दा ट्रेनिंग दिलं जाईल.
प्रकिया
सोया मिल्क तयार करण्यासाठी तुम्हाला तीनपट जास्त पाण्यात सोयाबीनच्या बीया ४ ते ५ तासांसाठी गरम पाण्यात भिजवत ठेवायला लागतील. त्यानंतर १२ तासांपर्यंत थंड वातावरणात ठेवायला लागतं. त्यानंतर भिजवत ठेवलेल्या सोयाबीन्सना बारीक करून घ्यावे लागतील मग कुकिंग मशीनमध्ये १२० डिग्री तापमानात १० मिनिटं ठेवा. त्यानंतर यंत्राच्या सहाय्याने गाळून तुम्ही ते दूध विक्रीसाठी पिशवीत भरू शकता. या प्लान्टसाठी तुम्हाला १०० स्वेअर मीटर इतकी जागा लागेल. जी जागा तुमच्या कडे सध्या उपलब्ध नसल्यास तुम्ही भाड्याने सुद्घा घेऊ शकता. त्याचसोबत ग्राइंडर, कुकर, मॅकेनिकल फिल्टर प्रेस, टोपो बॉक्स आणि सोकिंग टैंक या ,साधनसामग्रीची आवश्यकता असेल.
अधिक माहितीसाठी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या .https://www.nsic.co.in/Info/ProejctProfiles.aspx