Lokmat Money > बिझनेस न्यूज > उत्तम सिबिल स्कोअर ही व्यावसायिकाची गरज

उत्तम सिबिल स्कोअर ही व्यावसायिकाची गरज

सद्यपरिस्थितीत व्यावसायिक वृद्धीकरता बँकांकडून व वित्तीय संस्थांकडून सुलभ कर्ज मिळवणे हे अनिवार्य ठरले आहे. म्हणूनच देशभरातील लघू उद्योग क्षेत्रांतील आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी विविध योजना आखल्या आहेत. त्याअंतर्गत व्यावसायिकांना कमी व्याज दराने कर्ज मिळविण्यास मदत होते. मात्र व्यावसायिकाला कर्ज प्राप्त करताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते आणि त्यातीलच एक कारण म्हणजे सिबिल (उकइकछ) स्कोअरविषयी असलेली अनभिज्ञता. या लेखांतर्गत आपण सिबिल स्कोअरचे व्यवसायातील महत्त्व जाणून घेऊ.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 05:10 AM2018-05-06T05:10:38+5:302018-05-06T05:10:38+5:30

सद्यपरिस्थितीत व्यावसायिक वृद्धीकरता बँकांकडून व वित्तीय संस्थांकडून सुलभ कर्ज मिळवणे हे अनिवार्य ठरले आहे. म्हणूनच देशभरातील लघू उद्योग क्षेत्रांतील आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी विविध योजना आखल्या आहेत. त्याअंतर्गत व्यावसायिकांना कमी व्याज दराने कर्ज मिळविण्यास मदत होते. मात्र व्यावसायिकाला कर्ज प्राप्त करताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते आणि त्यातीलच एक कारण म्हणजे सिबिल (उकइकछ) स्कोअरविषयी असलेली अनभिज्ञता. या लेखांतर्गत आपण सिबिल स्कोअरचे व्यवसायातील महत्त्व जाणून घेऊ.

 The best civil score is the need of the businessman | उत्तम सिबिल स्कोअर ही व्यावसायिकाची गरज

उत्तम सिबिल स्कोअर ही व्यावसायिकाची गरज

- प्रतीक कानिटकर

बिल स्कोअर किंवा अहवाल हा ‘क्रेडिट इन्फर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड’तर्फे व्यक्तीच्या वित्तीय डेटावर म्हणजेच बँकेतील व्यवहारांवर तसेच आजवर घेतलेल्या कर्ज परतफेडीच्या व्यवहारांवर आधारित तयार केला जातो. या डेटामध्ये आपली देयके म्हणजेच कर्ज आणि क्रेडिट कार्डचे रेकॉर्ड समाविष्ट केले जातात. क्रेडिट इन्फर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेडच्या सदस्य बँका प्रत्येक महिन्याला कर्जदाराची संपूर्ण माहिती उकइकछ ला सादर करतात आणि त्यावर आधारित हा अहवाल तयार केला जातो. बँका तसेच वित्तीय संस्था सिबिल स्कोअर पाहून मगच कर्जदाराची कर्ज घेण्याची पात्रता ठरवितात, म्हणजेच सिबिल स्कोअर संख्या व्यक्तीच्या क्रेडिट पात्रतेचे प्रतिनिधित्व करते. सिबिलमधील उत्तम स्कोअर हा चांगला क्रेडिट इतिहास आणि जबाबदार कर्जाच्या परतफेडीचे वर्तन सूचित करतो आणि म्हणूनच कर्ज मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये सिबिल स्कोअर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो.
सिबिल स्कोअर जितका जास्त असेल तितकी कर्जमंजुरीची शक्यताही अधिक असते. सिबिल स्कोअर हा ३०० ते ९०० गुणांदरम्यान असतो, आणि ७५० पेक्षा अधिक गुण हे सामान्यत: चांगला स्कोअर म्हणून ओळखला जातो. सिबिल स्कोअर जर ७५० हून अधिक असल्यास, अशा कर्जदारांना सर्वोत्कृष्ट व्याजदरांसह कर्ज आणि क्रेडिट कार्ड उपलब्ध केले जाते.
थोडक्यात क्रेडिट स्कोअर हा आपल्याला योग्य कर्ज मिळवण्याकरता आवश्यक असलेली पत ठरवतो. सिबिल स्कोअरवरील उच्च स्कोअरिंग व्यक्तीच्या शिस्तबद्ध खर्चाची आणि परतफेडीची वागणूक आणि वित्तव्यवस्थेच्या विल्हेवाटीवर प्रभावी व्यवस्थापन असल्याचे सूचक मानले जाते. आणि म्हणूनच ज्या व्यक्तीला गृह कर्ज, वाहन कर्ज, व्यवसाय कर्ज अथवा कोणत्याही प्रकाचे कर्ज भविष्यात घेण्याचा मानस असल्यास, त्यांनी सिबिल स्कोअरवर विशेष लक्ष देऊन उत्तम क्रेडिट रेटिंग्स मिळवण्याच्या दृष्टीने पावले उचलणे हे योग्य ठरेल.

चांगला सिबिल स्कोअर कायम ठेवण्याकरिता हे करा

आपल्या देय रकमेची म्हणजेच कर्जाच्या हफ्त्याची वेळेवर परतफेड करून आपण आपला सिबिल स्कोअर उत्तम राखू शकतो.

आपल्या कर्जाची रकम म्हणजेच देणी ही कमीत कमी शिल्लक ठेवल्याने आपण आपला सिबिल स्कोअर उत्तम राखू शकतो. जितके आवश्यक असेल तितकेच कर्ज घेतल्याने हे साध्य करणे सोपे जाते.

आपल्यासह स्वाक्षरीकर्ता म्हणजेच कर्जदाराकरिता जर आपण गॅरेंटर राहिला असाल तर अशा संयुक्त खात्यांची माहिती वेळोवेळी घेत राहा. कर्जाची परतफेड सुनिश्चित करण्यासाठी कर्जाच्या कोणत्याही स्वरूपावर गॅरेंटर तितकाच जबाबदार आहे. म्हणून, गॅरेंटर कर्जदाराला हमी देतो की जर मुख्य अर्जदार तसे करण्यास असमर्थ असेल तर ते दायित्व स्वीकारेल. मुख्य अर्जदाराचे कर्जाच्या देयकावर कोणतेही डिफॉल्टदेखील आपल्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम करतो.

आपले रेटिंग सुधारित करण्यासाठी आपल्या क्रेडिट कार्डावरील वापर व खर्च कमी करणे हा एक उत्तम उपाय ठरू शकतो. आपल्या क्रेडिट कार्डवरील खर्च अशा पद्धतीने योजून द्या की आपण देय तारखेच्या आधी आपली शिल्लक थकबाकी दिली असेल.

समरूप मासिक हप्ते भरणा (ईएमआयचा योग्य भरणा) आवश्यक आहे.

आपल्या कर्जाचा मासिक हप्ता वेळेत भरल्याने, ट्रॅक रेकॉर्ड सुधारण्यास मदत होते आणि आपला सिबिल स्कोअर उत्तम राहतो.

सिबिलमधील उत्तम स्कोअर हा चांगला क्रेडिट इतिहास आणि जबाबदार कर्जाच्या परतफेडीचे वर्तन सूचित करतो. म्हणूनच कर्ज मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये सिबिल स्कोअर महत्त्वाची भूमिका बजावतो.


 

Web Title:  The best civil score is the need of the businessman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.