Lokmat Money > बिझनेस न्यूज > छप्परफाड कमाई! अवघ्या ४० पैशांच्या शेअरमुळे गुंतवणूकदार करोडपती; वर्षभरात दणदणीत रिटर्न 

छप्परफाड कमाई! अवघ्या ४० पैशांच्या शेअरमुळे गुंतवणूकदार करोडपती; वर्षभरात दणदणीत रिटर्न 

वर्षभरात शेअरनं दिला तब्बल १९,२७५ टक्के परतावा; गुंतवणूकदारांची चांदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 05:47 PM2022-02-22T17:47:47+5:302022-02-22T17:49:25+5:30

वर्षभरात शेअरनं दिला तब्बल १९,२७५ टक्के परतावा; गुंतवणूकदारांची चांदी

best multibagger penny stock list bumper return better than broader market | छप्परफाड कमाई! अवघ्या ४० पैशांच्या शेअरमुळे गुंतवणूकदार करोडपती; वर्षभरात दणदणीत रिटर्न 

छप्परफाड कमाई! अवघ्या ४० पैशांच्या शेअरमुळे गुंतवणूकदार करोडपती; वर्षभरात दणदणीत रिटर्न 

कमी किमतीत मिळणारे अनेक शेअर्स गुंतवणूकदारांना छप्परफाड कमाई करून देतात. बड्या कंपन्यांपेक्षा या शेअर्समधून अनेकदा जास्त परतावा मिळतो. मात्र त्यासाठी अचूक अभ्यास आणि जोखीम पत्करण्याची तयारी हवी. वर्षभरापूर्वी Equipp Social Impact Technologies मध्ये गुंतवणूक केलेल्या अनेकांनी छप्परफाड कमाई केली आहे. एका वर्षात या शेअरनं बंपर परतावा दिला आहे. त्यामुळे केवळ लाखभर गुंतवणारे आज करोडपती झाले आहेत.

वर्षभरापूर्वी Equipp Social Impact Technologies चा शेअरचा दर १ रुपयापेक्षाही कमी होता. गेल्या वर्षी १९ फेब्रुवारीला शेअरची किंमत केवळ ४० पैसे होती. आता ती ७७ रुपयांच्या घरात आहे. वर्षभरात शेअरनं १९,२७५ टक्के परतावा दिला आहे. एखाद्या गुंतवणूकदारानं वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये लाखभर रुपये गुंतवले असल्यास आता त्याची किंमत १.९३ लाख रुपये इतकी असेल.

गेल्या वर्षभरात सेन्सेक्समध्ये झालेली वाढ १३.३९ टक्के इतकी आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून बाजारात पडझड पाहायला मिळत आहे. याचा फटका Equipp Social Impact Technologies च्या शेअरलादेखील बसला. जानेवारीपासून शेअरची किंमत २७.१८ टक्क्यांनी घसरली आहे. फेब्रुवारीत शेअरचा दर १०.६४ टक्क्यांनी घटला. मात्र आजही तो २०० दिवसांच्या सरासरीपेक्षा वर आहे.

बीएसईवर मंगळवारी Equipp Social Impact Technologies कंपनीच्या ५ हजार ७०० शेअर्सची खरेदी विक्री झाली. त्यातून ४.२९ लाख रुपयांची उलाढाल झाली. कंपनीचं मार्केट कॅपिटल ८०० कोटी रुपये आहे. 

Web Title: best multibagger penny stock list bumper return better than broader market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.