Join us

इंधन दरवाढीचा जबरदस्त फायदा; 'या' शेअरची कमाल, गुंतवणूकदार मालामाल; वर्षभरात पैसे दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 11:52 AM

येत्या कालावधीत शेअरची किंमत २० टक्क्यांनी वाढणार

गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. खनिज तेलाला पर्याय देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. त्यामुळे सरकार इलेक्ट्रिक वाहनांसह फ्लेक्स फ्युएल इंजिन असलेल्या वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देत आहे. यामुळे इथेनॉलची मागणी वाढत आहे. याचा परिणाम अनेक शेअर्सच्या किमतींवर होत आहे. 

प्राज इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत गेल्या वर्षभरापासून वाढत आहे. गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. हा शेअरची किंमत आणखी वाढेल असं ब्रोकरेज हाऊसेसना वाटतं. ६ एप्रिल २०२१ रोजी प्राज इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत १८८.६० रुपये होती. आता एनएसईवर शेअरची किंमत ३९५ रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षभरात शेअरनं १०९.४४ टक्के परतावा दिला आहे.

वर्षभरापूर्वी प्राज इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये एखाद्या व्यक्तीनं १ लाख गुंतवले असते, तर आज त्या रकमेचं २.१० लाख रुपये झाले असते. पाच वर्षांपूर्वी प्राज इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत ८०.८० रुपये होती. पाच वर्षांत शेअरची किंमत ३८९ टक्क्यांनी वाढली. जानेवारीपासून शेअरची किंमत १७ टक्क्यांनी वाढली आहे.

ऍक्सिस सिक्युरिटीजच्या अंदाजानुसार, या शेअरची किंमत आणखी वाढू शकते. प्राज इंडस्ट्रीजला देशांतर्गत बाजारात जैविक उर्जेतून मदत मिळत आहे. इथेनॉलची वाढती मागणी, धान्यावर आधारित डिस्टिलरीजचं वाढतं महत्त्व, डिकार्बनायझेशन यामुळे शेअरची किंमत वाढू शकते. प्राज इंडस्ट्रीजच्या शेअरचा दर ४७७ रुपयांपर्यंत जाऊ शकतो. म्हणजेच शेअरची किंमत २० टक्क्यांनी वाढू शकते.

टॅग्स :शेअर बाजारखनिज तेलइंधन दरवाढ