Join us

Best Multibagger Stock: आनंदाने नाचला असता! पहिल्याच दिवशी पैसे डबल; या आयपीओने दीड वर्षांत केले पंधरा हजाराचे १ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 10:25 AM

Share Market Trend: या कंपनीने लिस्टिंगच्या दिवशीच गुंतवणूक दारांचा पैसा डबल केला होता. आता तर तो 575 टक्के वाढला आहे.

पेटीएमसारख्या बड्या बड्या कंपन्यांनी बुडविलेले असताना छोट्या छोट्या कंपन्यांनी लोकांना मालामाल केले आहे. अनेक आयपीओंनी पैसे घेतले आणि निम्म्याहून कमी किंमतीवर शेअर आदळले आहेत. परंतू आयटी कंपनी Happiest Minds ने गुंतवणूकदारांना मोठा पैसा मिळवून दिला आहे. 

या कंपनीने लिस्टिंगच्या दिवशीच गुंतवणूक दारांचा पैसा डबल केला होता. आता तर तो 575 टक्के वाढला आहे. हॅप्पीएस्ट माईंड आयपीओ सप्टेंबर २०२० मध्ये लाँच झाला होता. या आयपीओचा प्राईस बँड 165-166 रुपये प्रति शेयर होता. या आयपीओद्वारे कंपनीने 702.02 कोटी रुपये जमविण्याचे लक्ष्य ठेवले होते. हे शेअर्स गुंतवणूकदारांनी झटपट विकत घेतले होते. १७ सप्टेंबरला हा शेअर बीएसई आणि एनएसईवर लिस्ट झाला तेव्हाच १०० टक्क्यांहून अधिक प्रिमिअम मिळाला होता. बीएसईवर ३५१ आणि एनएसईवर ३५० रुपयांच्या स्तरावर लिस्ट झाला होता. 

शुक्रवारी, शेअर NSE वर 1,122 रुपयांवर बंद झाला. IPO च्या प्राइस बँडशी तुलना केल्यास, हा मल्टीबॅगर स्टॉक आतापर्यंत सुमारे 575 टक्क्यांनी वाढला आहे. अशाप्रकारे या IPO मध्ये एखाद्या गुंतवणूकदाराला एक जरी लॉट मिळाला असता तरी तो लखपती झाला असता. एका लॉटची किंमत 14,940 रुपये होती आणि आज ती 1 लाख रुपयांच्या पुढे गेली आहे. लिस्ट झाल्यानंतरही त्यात कोणी पैसे गुंतवले असते तर आज ते १०० पट जास्त झाले असते.

गेल्या सहा महिन्यांत या शेअरच्या किमतीत सुमारे २१ टक्क्यांनी घट झाली आहे. एकवेळ अशी होती की, हा शेअर 1,422 रुपयांवर पोहोचला होता. गेल्या सहा महिन्यांतील आयटी समभागातील विक्रीचाही त्यावर परिणाम झाला आहे. गेल्या महिनाभरात 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

टॅग्स :शेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंग