कोरोना संकट काळात इक्विटीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली. अनेक पेनी स्टॉक्सनी या कालावधीत गुंतवणूकदारांना मालामाल केलं. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेअरची माहिती देणार आहोत. या शेअरनं गेल्या ५ महिन्यांत गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे.
मुंबई शेअर बाजारात २८ ऑक्टोबर २०२१ रोजी SEL Manufacturing Company Limitedच्या शेअरची किंमत ५.०१ रुपये होती. १ एप्रिलला शेअर बाजार बंद होत असताना याच शेअरची किंमत ४७०.५५ रुपयांवर पोहोचली. म्हणजेच अवघ्या ५ महिन्यांत या शेअरनं गुंतवणूकदारांना ९,२९२ टक्के परतावा दिला.
कंपनीच्या शेअरची किंमत ३१ डिसेंबर २०२१ रोजी ३७.६५ रुपये होती. एप्रिलच्या पहिल्याच दिवशी शेअरची किंमत ४७०.५५ रुपये होती. या वर्षात कंपनीच्या शेअरनं गुंतवणूकदारांना १,१४९ टक्के परतावा दिला आहे.
एखाद्या गुंतवणूकदारानं २८ ऑक्टोबर २०२१ रोजी या शेअरमध्ये १ लाखाची गुंतवणूक केली असेल आणि १ एप्रिल २०२२ पर्यंत त्यानं ही गुंतवणूक कायम ठेवली असेल तर त्याच्या गुंतवणुकीचं मूल्य ९३.९१ लाख रुपये झालेलं असेल. त्यामुळे सहा महिन्यापेक्षाही कमी कालावधीत या शेअरनं गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. एखाद्यानं ३१ डिसेंबर २०२१ रोजी या शेअरमध्ये १ लाख रुपये गुंतवले असतील, तर आता त्याचे १२.४९ लाख रुपये झालेले असतील.