Lokmat Money > बिझनेस न्यूज > Best retirement Plan: २५ व्या वर्षात सुरुवात, रिटायरमेंटवर मिळतील ₹३ कोटी; पेन्शनही मिळणार, जाणून घ्या

Best retirement Plan: २५ व्या वर्षात सुरुवात, रिटायरमेंटवर मिळतील ₹३ कोटी; पेन्शनही मिळणार, जाणून घ्या

Best retirement plan: भविष्यात रिटायरमेंटनंतरही उत्तम आयुष्य जगण्यासाठी गुंतवणूक करणं महत्त्वाचं आहे. कोणीही व्यक्ती असो, त्यांनी निवृत्तीनंतरचं नियोजन करणं आवश्यक आहे. पाहा कसा जमवू शकता तुम्ही मोठा फंड आणि मिळवू शकता पेन्शन.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 02:14 PM2024-05-29T14:14:26+5:302024-05-29T14:14:48+5:30

Best retirement plan: भविष्यात रिटायरमेंटनंतरही उत्तम आयुष्य जगण्यासाठी गुंतवणूक करणं महत्त्वाचं आहे. कोणीही व्यक्ती असो, त्यांनी निवृत्तीनंतरचं नियोजन करणं आवश्यक आहे. पाहा कसा जमवू शकता तुम्ही मोठा फंड आणि मिळवू शकता पेन्शन.

Best Retirement Plan Starting in 25th year get rs 3 crore on retirement You will also get pension know details | Best retirement Plan: २५ व्या वर्षात सुरुवात, रिटायरमेंटवर मिळतील ₹३ कोटी; पेन्शनही मिळणार, जाणून घ्या

Best retirement Plan: २५ व्या वर्षात सुरुवात, रिटायरमेंटवर मिळतील ₹३ कोटी; पेन्शनही मिळणार, जाणून घ्या

Best retirement plan: भविष्यात रिटायरमेंटनंतरही उत्तम आयुष्य जगण्यासाठी गुंतवणूक करणं महत्त्वाचं आहे. कोणीही व्यक्ती असो, त्यांनी निवृत्तीनंतरचं नियोजन करणं आवश्यक आहे. तुम्ही खासगी क्षेत्रात नोकरी करत असाल तरी तुम्हाला पेन्शनचा लाभ मिळू शकतो. त्याचा उत्तम पर्याय म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टीम. एनपीएसमध्ये जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल तितका निवृत्तीनंतर त्याचा फायदा होईल.
 

लाभ कसा मिळेल?
 

सर्वप्रथम, आपल्याला एक मोठा रिटायरमेंट फंड (Retirement fund) तयार करण्याची संधी मिळते. दर महिन्याला चांगल्या पेन्शनचा पर्यायही आहे. मात्र, एनपीएसमधील गुंतवणुकीवर किमान पेन्शनची गॅरेंटी नाही. हे आपल्या वार्षिकी रकमेवर आणि त्यावर मिळणाऱ्या अंदाजित परताव्यावर अवलंबून असेल.
 

वय आणि गुंतवणुकीवरून ठरेल कॉर्पस
 

एनपीएस कॅल्क्युलेटरच्या मदतीनं तुम्ही समजू शकता की जर तुमचं वय २५ वर्षे असेल आणि दर महिन्याला १० हजार रुपयांची गुंतवणूक केली तर ६० वर्षात निवृत्तीनंतर तुमचा अंदाजित कॉर्पस किती असेल? तसेच मासिक पेन्शन किती मिळणार? जर तुम्ही ६० व्या वर्षी निवृत्त होणार असाल, तुमचं सध्याचं वय २५ आहे आणि तुम्ही दरमहा १०,००० रुपये एनपीएसमध्ये टाकता असं गृहित धरू.
 

एसबीआय पेन्शन फंडाच्या एनपीएस कॅलक्युलेटरसह, निवृत्तीनंतर किती रक्कम आणि पेन्शन मिळेल हे समजून घेऊ.
 

  • एनपीएसमधील मासिक गुंतवणूक : रु. १०,००० 
  • ३५ वर्षांतील एकूण योगदान : ४२ लाख रुपये
  • गुंतवणुकीवरील अंदाजित परतावा : १०%
  • मुदतपूर्तीच्या वेळी एकूण रक्कम : ३.७५ कोटी रुपये
  • अॅन्युईटी परचेस : ४०% (१.५ कोटी रुपये)
  • अंदाजे अॅन्युईटी रेट:  ६%
  • ६० व्या वर्षी पेन्शन : दरमहा ७४,९५८ रुपये
     


(टीप - वर देण्यात आलेलं कॅलक्युलेश अंदाजानुसार देण्यात आलेलं आहे. वास्तविक आकड्यांमध्ये फरक असू शकतो.)
 

एनपीएसमध्ये जर तुम्ही ४० टक्के अॅन्युईटी घेतली (कमीत कमी इतकी ठेवणे आवश्यक आहे) आणि अॅन्युईटी रेट ६ टक्के असेल तर निवृत्तीनंतर तुम्हाला सुमारे सव्वा कोटी रुपये एकरकमी मिळतील आणि दीड कोटी रुपये अॅन्युईटीत जातील. या अॅन्युइटी रकमेतून तुम्हाला दरमहा सुमारे ७५ हजार रुपये पेन्शन मिळेल. अॅन्युईटीची रक्कम जितकी जास्त असेल तितकी जास्त पेन्शन मिळेल. एनपीएसमध्ये जमा झालेली रक्कम गुंतविण्याची जबाबदारी पीएफआरडीएने नोंदणीकृत पेन्शन फंड मॅनेजर्सना दिली आहे. ते तुमची गुंतवणूक इक्विटी, सरकारी सिक्युरिटीज आणि नॉन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज व्यतिरिक्त फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट्समध्ये गुंतवतात.
 

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Best Retirement Plan Starting in 25th year get rs 3 crore on retirement You will also get pension know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.