टॅक्स रिटर्न फाइल करण्याची प्रक्रिया आता पूर्वीपेक्षा फारच सोपी झालीये. कुणाचीही मदत न घेता तुम्ही स्वत: रिटर्न फाइल करताना काही डिडक्शन क्लेम करु शकता. म्हणजेच तुमच्या इन्व्हेस्टमेंटची माहिती देऊन टॅक्समध्ये सूट मिळवू शकता. रिटर्न फाइल करताना खालील गोष्टी तुमचा टॅक्स वाचवू शकता.
1 ) इक्विटी लिंग्ड सेविंग स्किम (ELSS) : करात सूट किंवा फायदा करून घ्यायचा असेल तर हा पर्याय तुमच्यासाठी अधिक फायदेशीर आहे. हा प्रर्याय डाईवर्सिफाईड म्यूचल फंड प्रकारात मोडणारा आहे. ज्यात तुम्हाला इन्कम टॅक्स कायद्याअंदर्गत तुम्हला सुट मिळवता येते. या पर्यायात आपण गुंतवणीकीसोबत आपणाला पैसा वाढवण्याचीही संधी मिळते.
2) टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट (FD) : या पर्यायात फिस्क्ड डिपॉझिट केणत्याही बॅंकेतील एफडीपेक्षा कमी व्याजाने मिळते. या प्रकारच्या डिपॉझिटसाठी 5 वर्षांचा लॉक इन पीरियड असतो. दरम्यान, या प्रकारच्या एफडीवर मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स लावला जातो.
3) कर्मचारी प्रॉविडेंट फंड (EPF) : या पर्यायात आपल्या मासिक पगारात प्रॉविडंट फंडातून कापून जाणाऱ्या पैशांना इनकम टॅक्स नियमांनुसार (80 अन्वये) टॅक्स मध्ये सूट मिळते.
4) पब्लिक प्रॉविडंट फंड (PPF): ही एक छोटी बचत योजना आहे. ज्यात आपल्याला कमीत कमी 500 रूपयांपासून आणि जास्तीत जास्त 1.50 लाख रूपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. या गुंतवणूकीवर आपल्याला 8 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. यात गुंतवणूक आणि त्यावर मिळणारे व्याज हे पूर्णपणे करमुक्त असते.
5) यूनिट लिंक्ड इश्यूरंन्स प्लान (ULIP) : हा एक इश्युरन्स प्लान आहे. यात आपल्या गुंतवणुकीसोबत आपल्याला इंश्युरन्सही मिळतो. हा पर्यायही तुम्हाला इनकमटॅक्स नियमांच्या सेक्शन 80 अन्वयेच उपलब्ध आहे.
6) सुकन्या समृद्धी योजना (SSS): या योजने अंतर्गत आपल्याला आपल्या 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावे गुंतवणूक करता येते. ही गुंतवणूकही इन्कम टॅक्स नियमाच्या सेक्शन 80 अन्वये करता येते. या गुंतवणूकीत कमीत कमी 1000 रूपयांपासून 1.50 लाखांपर्यंत आपण वार्षिक गुंतवणूक करू शकता. या योजने अंतर्गत आपण केवळ दोन मुलींच्या नावेच गुंतवणूक करू शकता. महत्त्वाचे म्हणजे 21 वर्षांनंतर आपण ही गुंतवणूक करू शकत नाही. ती आपोआप बंद होते.
7) नॅशनल पेमेंट सिस्टम (NPS) : इन्कम टॅक्स नियम सेक्शन 80 अन्वये एनपीएसमध्ये आपण प्रतिवर्ष 1.50 लाख रूपयांपर्यंत गुंतवणूक करू शकाता. तसेच, याच सेक्शनमध्ये 800 ललीजी (1बी) अन्वये आपण 50,000 पर्यंत अतिरीक्त गुंतवणूकही करू शकता. याचाच अर्थ असा की एनपीएसमध्ये आपण सुमारे 2 लाख रूपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.