Join us  

सावधान! दुसरं कोणी तुमच्या PAN Card चा वापर करत आहे का? त्वरित चेक करा…

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 8:36 PM

पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे सरकारी ओळखपत्र आहे. हे अनेक कारणांसाठी वापरले जाऊ शकते.

पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे सरकारी ओळखपत्र आहे. हे अनेक कारणांसाठी वापरले जाऊ शकते. कर्ज घ्यायचे असो किंवा कर भरणे असो, पॅनकार्ड खूप महत्त्वाचे आहे. तसे, ते फक्त तुमच्याकडेच राहते आणि कोणाकडे जाण्यासाठी अथवा देण्यासाठी वाव नाही. पण तरीही पॅन कार्डच्या फसवणुकीबाबत अनेक बातम्या समोर येत आहेत. अशा परिस्थितीत तुमचे पॅन कार्ड चुकीच्या ठिकाणी वापरले जात आहे का अथवा नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

फसवणूक करणारे तुमचे पॅन कार्ड कर्ज घेण्यासाठी, क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी, खोटे दागिने खरेदी करण्यासाठी किंवा हॉटेल/वाहन बुक करण्यासाठी वापरू शकतात. तुमचे पॅनकार्ड बेकायदेशीर कामात गुंतल्याचे आढळल्यास तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो. अशा परिस्थितीत, याआधी तुम्हाला हे शोधून काढावे लागेल की तुमचे पॅनकार्ड तुमच्या व्यतिरिक्त कोण वापरत आहे.

कसं तपासाल?

  • हे तपासण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे क्रेडिट स्कोअर तपासणे. यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
  • तुम्ही ट्रान्सयुनियन, सिबिल, इक्विफॅक्स, एक्सपिरिअन, Paytm, Bank Bazaar किंवा CRIF High Mark यांचा समावेस असलेल्या विविध वेबसाइट्सद्वारे हे तपासू शकता.
  • सर्व प्रथम वेबसाइट उघडा. नंतर चेक क्रेडिट स्कोर सर्च करा. हे सहसा विनामूल्य असते. परंतु काही वेबसाइट तपशीलवार क्रेडिट स्कोअरसाठी पैसे आकारतात.
  • तुम्हाला जन्मतारीख, ईमेल आयडी, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि पॅन कार्ड क्रमांक समाविष्ट असलेले काही तपशील देखील द्यावे लागतील.
  • मोबाईल नंबरवर एक OTP येईल जो तुम्हाला टाकावा लागेल.
  • यानंतर तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर पाहू शकाल. इथे तुमच्या नावावर काय काय आहे याची माहिती मिळेल. 

कसा रिपोर्ट कराल?

  • सर्वप्रथम तुम्हाला TIN NSDL वर जावे लागेल. त्यानंतर कस्टमर केअर विभागात जा.
  • यानंतर, ड्रॉप-डाउन मेन्यूवर जाऊन तक्रारी/क्वेरीवर क्लिक करावे लागेल. यानंतर तक्रार फॉर्म उघडेल.
  • हा फॉर्म भरा. नंतर कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
टॅग्स :पॅन कार्डधोकेबाजी