Lokmat Money > बिझनेस न्यूज > सावधान! १० क्षेत्रांतील नोकऱ्यांना वाढला धाेका

सावधान! १० क्षेत्रांतील नोकऱ्यांना वाढला धाेका

एआय येणार मुख्य भूमिकेत, भविष्यात वापर वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 03:27 PM2023-02-08T15:27:38+5:302023-02-08T15:27:57+5:30

एआय येणार मुख्य भूमिकेत, भविष्यात वापर वाढणार

Beware Jobs in 10 sectors are in big trouble | सावधान! १० क्षेत्रांतील नोकऱ्यांना वाढला धाेका

सावधान! १० क्षेत्रांतील नोकऱ्यांना वाढला धाेका

नवी दिल्ली : तंत्रज्ञान क्षेत्रात आगमन झालेल्या ‘चॅटजीपीटी’चे अनेकांना कुतूहल आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) काम करणारे चॅटबॉट चॅटजीपीटी गेल्या वर्षी ३० नोव्हेंबर राेजी लॉन्च झाले होते. जानेवारीत त्याचे मासिक सक्रिय वापरकर्ते १० कोटी झाले आहेत. मात्र, त्याचवेळी ‘चॅटजीपीटी’ आणि ‘एआय’मुळे प्रमुख १० क्षेत्रांतील नोकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. चॅटजीपीटी हे इंटरनेटच्या इतिहासातील सर्वांत वेगाने वाढणारे ॲप्लिकेशन ठरले आहे. 

एआय येणार मुख्य भूमिकेत, भविष्यात वापर वाढणार
‘इंटरनेट सर्च’च्या माध्यमातून तयार माहिती शोधकर्त्यास उपलब्ध करून देते. त्यात अजून बऱ्याच त्रुटी असल्या तरी अनेक पांढरपेशे (व्हाइट कॉलर) रोजगार त्यामुळे धोक्यात येऊ शकतात. ‘एआय’चा वापर भविष्यात मुख्य धारा बनणार आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार, एआय स्टार्टअपची संख्या १४ पट वाढली आहे. ७१ टक्के कार्यकारी अधिकाऱ्यांना वाटते की, भविष्यात एआय हे व्यवसायात मुख्य भूमिकेत येणार आहे.

या क्षेत्रातील नोकऱ्यांना होऊ शकतो दगाफटका -
- तंत्रज्ञान क्षेत्र (कोडर्स, कॉम्प्युटर प्रोग्रामर्स, सॉफ्टवेअर इंजिनिअर, वेब डेव्हलपर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, डेटा ॲनालिस्ट)
- माध्यम क्षेत्र (पत्रकारिता, जाहिरात, कंटेंट क्रिएशन, टेक्निकल राइटिंग)
- कायदा क्षेत्र (पॅरालीगल्स, असिस्टंट्स)
- मार्केट रिसर्च ॲनालिस्ट्स
- शिक्षक, प्राध्यापक
- वित्तीय क्षेत्र (वित्तीय विश्लेषक, सल्लागार)
- ट्रेडर्स, शेअर ॲनालिस्ट
- ग्राफिक डिजाइनर्स
- अकाउंटंट
- कस्टमर सर्व्हिस एजंट

लढू नका, विकसित व्हा
एआय ही एक क्रांती आहे. काेणीही त्यास राेखू शकणार नाही. त्यामुळे मनुष्यबळाचे काैशल्य विकसित करण्यावर भर दिला पाहिजे. संगणक आला त्यावेळीही असेच झाले हाेते.

Web Title: Beware Jobs in 10 sectors are in big trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.