दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications) शुक्रवारी ग्राहकांना त्यांच्या मोबाइल सेवा खंडित करण्याची धमकी देणाऱ्या 'कॉल' संदर्भात एक अलर्ट जारी केला. अशा बनावट कॉल्समध्ये सातत्यानं होत असलेल्या वाढीबद्दल सरकारनं अलर्ट केलं आहे. असे नंतर दूरसंचार विभाग दोन तासांच्या आत बंद करेल असं त्यांनी म्हटलंय.
वैयक्तिक माहिती देऊ नका
डॉट नागरिकांचं फोन कनेक्शन कापण्यासाठी धमकी देणारे कॉल करत नाही. असे कॉल येत असताना नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये असे आवाहन डॉटकडून करण्यात आलं आहे.
सेवा खंडीत करण्याचा इशारा नाही
डॉटनं नागरिकांना विनंती केली आहे की त्यांना कोणताही कॉल आल्यास कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका. अशा कॉलच्या सत्यतेसाठी तुमच्या सेवा प्रदात्यांकडून माहिती घ्या, असं अलर्टमध्ये म्हटलं आहे. डॉट फोन कॉलद्वारे डिस्कनेक्शनसाठी कोणताही इशारा देत नाही. असा कोणताही कॉल संशयास्पद मानला पाहिजे. डॉटनं नागरिकांना कोणत्याही संशयास्पद कॉलची तक्रार नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर करण्यास सांगितलं आहे.
डॉट काय करतं?
युनिफाइड एक्सेस सर्व्हिस, इंटरनेट आणि व्हीसॅट सेवा यासारख्या विविध दूरसंचार सेवांना परवाने देण्याची जबाबदारी या विभागाची आहे. याव्यतिरिक्त, मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीशी संबंधित समस्यांचं निराकरण करण्यासाठी, कनेक्शन अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या विभागाच्या खांद्यावर आहेत.
मोबाईल सर्व्हिस बंद करण्याची धमकी देणाऱ्या 'कॉल'पासून सावध राहा, सरकारनं केलं अलर्ट
असे कॉल आल्यास काय काळजी घ्यावी, पाहा काय म्हटलंय दूरसंचार विभागानं.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 05:51 PM2023-11-11T17:51:54+5:302023-11-11T17:57:39+5:30