Join us

नवरत्न कंपनीच्या शेअरची कमाल, 1 लाखाचे केले ₹6.15 CR; आता मिळाल्या 3289 कोटींच्या ऑर्डर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 1:32 PM

आज कंपनीच्या शेअरची किंमत वाढली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्सचा शेअर सकाळी 136.10 रुपयांवर खुला झाला आणि दिवस भरातील आपल्या 136.40 रुपयांच्या उच्चांकावर जाऊन पोहोचला.

संरक्षण क्षेत्रात काम करणारी नवरत्न कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला जुलै आणि ऑगस्ट 2023 मध्ये (आतापर्यंत) 3,289 कोटी रुपयांचे नवीन संरक्षण आणि गैर-संरक्षण कॉन्ट्रॅक्ट मिळाळे आहेत. यानंतर आज कंपनीच्या शेअरची किंमत वाढली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्सचा शेअर सकाळी 136.10 रुपयांवर खुला झाला आणि दिवस भरातील आपल्या 136.40 रुपयांच्या उच्चांकावर जाऊन पोहोचला. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 137.95 रुपये एवढा आहे.

कंपनीने आपल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, या ऑर्डर काही रडार, सोनार, आयएफएफ सिस्टिम, सॅटकॉम सिस्टिम, ईओ/आयआर पेलोड, टीआरएम/डीटीआरएम, जॅमर, एनक्रिप्टर, डेटा लिंक सिस्टिम, फायर कंट्रोल सिस्टिम, डायरेक्टेड एनर्जी सिस्टिमसाठी रडार, सेमी रग्ड टेलीफोन एक्सचेन्ज, सॉफ्टवेअर डिफाइंड रेडिओ आणि विविध प्रकारचे रेडिओ, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन, देखभाल दुरुस्ती आणि सुटे भाग पूरविण्यासंदर्भात आल्या आहेत.

भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर प्राइस हिस्ट्री -भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअरने या वर्षात 35 टक्क्यांहून अधिकची उसळी घेतली आहे. गेल्या सहा मिहिन्यांत या शेअरने 43 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. 

एक लाखाचे केले सहा कोटी - भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या समभागांनी आपल्या गुंतवणूकदारांना बम्पर परतावा दिला आहे. 1 जानेवारी 1999 रोजी हा शेअर केवळ 22 पैशांवर होता. आजच्या तो 61377 टक्क्यांनी वाढून 135.30 रुपयांवर पोहोचला आहे. ज्या लोकांनी 24 वर्षांपूर्वी या शेरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, आता त्यांच्या या 1 लाख रुपयांच्या शेअरने 6 कोटी रुपयांचा (₹6,14,22,730) टप्पा ओलांडला आहे.(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

 

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसा