श्री रामायण स्पेशल (Sri Ramayana Special) दिल्लीहून सुटणार असली तरी गाझियाबाद, अलिगढ, टुंडला, इटावा, कानपूर आणि लखनौ स्थानकांवरूनही प्रवासी ट्रेनमध्ये प्रवास शकतात. ही ट्रेन १८ दिवसात पर्यटकांना प्रभू श्रीरामाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी घेऊन जाईल.
RCTC ची ही विशेष ट्रेन पूर्णपणे वातानुकूलित आहे. सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या ट्रेनमध्ये फर्स्ट एसी आणि सेकंड एसी कोच बसवण्यात आले आहेत. ट्रेनला दोन डबे आहेत ज्यात रेल डायनिंग रेस्टॉरंटचा लाभ घेता येईल. प्रवासात जेवणसाठी ट्रेनमध्ये आधुनिक किचन कार बसवण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी फूट मसाजर, मिनी लायब्ररी, आधुनिक आणि स्वच्छ टॉयलेट आणि शॉवर क्यूबिकल्स आदी सुविधाही उपलब्ध असतील. यासोबतच सुरक्षेसाठी प्रत्येक डब्यात सुरक्षा रक्षक, इलेक्ट्रॉनिक लॉकर आणि सीसीटीव्ही कॅमेरेही उपलब्ध असतील.
दिल्लीहून प्रवास सुरु होणारही ट्रेन ७ एप्रिल रोजी दिल्ली सफदरजंग येथून सुटेल. प्रवासाचा पहिला मुक्काम भगवान श्रीरामाचे जन्मस्थान अयोध्या असेल, जिथे श्री रामजन्मभूमी मंदिर, श्री हनुमान मंदिर आणि नंदीग्राममधील भारत मंदिराला भेट दिली जाईल. अयोध्येतून निघून ही ट्रेन सीतामढीला जाईल, जिथे जानकी जन्मस्थानाला भेट दिली जाईल. पर्यटकांना नेपाळमधील जनकपूर येथे नेलं जाईल. तेथे राम जानकी मंदिराचं दर्शन घेणार आहे. रात्रीचा मुक्काम नेपाळमधील जनकपूर येथील हॉटेलमध्ये असेल. यानंतर, ट्रेनचा पुढील थांबा बक्सर असेल, जिथे रामरेखा घाट आणि प्राचीन मंदिरांना भेट दिल्यानंतर, पर्यटक ट्रेनने काशीला रवाना होतील.
काशीत राहण्याची व्यवस्थाबक्सरहून धावणारी ही ट्रेन भगवान शंकराची नगरी काशीला पोहोचवेल. बनारसमध्ये पर्यटक काशीच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट देतील. काशीसोबतच त्यांना प्रयाग, शृंगवरपूर आणि चित्रकूट येथे एसी बसनं नेलं जाईल. यादरम्यान काशी, प्रयाग आणि चित्रकूट येथे पर्यटकांसाठी रात्रीच्या विश्रांतीची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यांना आरामदायी वातानुकूलित हॉटेलमध्ये रात्रभर मुक्काम दिला जाईल.
त्र्यंबकेश्वर मंदिराचंही दर्शनचित्रकूट येथून सुरू होणारी ही ट्रेन नाशिकला पोहोचेल, जिथे पंचवटी आणि त्र्यंबकेश्वर मंदिरांना भेट देता येईल. नाशिक नंतर, प्राचीन किष्किंधा शहर हंपी हे या गाडीचा पुढचा थांबा असेल, जिथे अंजनी पर्वत येथील श्री हनुमान जन्मस्थळ आणि इतर महत्त्वाच्या धार्मिक आणि वारसा मंदिरांना भेट दिली जाईल. हंपीनंतर ट्रेन रामेश्वरमला पोहोचेल. रामेश्वरममध्ये पर्यटकांना प्राचीन शिवमंदिर आणि धनुषकोडीला भेट देता येणार आहे.
तेलंगणातही जाणाररामेश्वरमनंतर पर्यटकांचा पुढचा थांबा तेलंगणातील भद्राचलम असेल. याला दक्षिणेची अयोध्या असंही म्हणतात. तेथे पर्यटकांना रस्ते मार्गानं भद्राचलमचं स्थळ-दर्शन दिलं जाईल. या गाडीचा शेवटचा थांबा नागपूर असेल जिथे पर्यटक रामटेक मंदिराला भेट देतील. नागपूरहून सुरू झालेली ही ट्रेन १८ तारखेला परत दिल्लीला पोहोचेल. या दरम्यान रेल्वेने सुमारे ७,५०० किमीचा प्रवास पूर्ण केला जाईल.
किती असेल भाडं?IRCTC ने या खास प्रवासासाठी वेगवेगळे दर निश्चित केले आहेत. एखाद्या व्यक्तीला एसी फर्स्ट क्लासमध्ये दोन व्यक्तींचे कूप घ्यायचे असल्यास त्यांना प्रति व्यक्ती १,६८,९५० रुपये मोजावे लागतील. जर तुम्हाला चार लोकांच्या केबिनमध्ये प्रवास करायचा असेल तर तुम्हाला प्रति व्यक्ती १,४६,५४५ रुपये मोजावे लागतील. तुम्हाला सेकंड एसी डब्यातून प्रवास केल्यास प्रति व्यक्ती १,१४,०६५ रुपये मोजावे लागतील.
काय असेल यात समाविष्ट?या टूर पॅकेजच्या किमतीत पूर्णवेळ शाकाहारी भोजन, वातानुकूलित बसनं पर्यटन स्थळांची फेरफटका, एसी हॉटेलमध्ये राहण्याची सोय, रेल्वे प्रवासाव्यतिरिक्त गाईड आणि विमा इत्यादींचा समावेश आहे. या संपूर्ण प्रवासादरम्यान IRCTC टीम सर्व स्वच्छता आणि आरोग्याशी संबंधित प्रोटोकॉलची काळजी घेईल. गरज भासल्यास प्रवाशांसाठी आपत्कालीन डॉक्टरांनाही पाचारण करण्यात येईल. दरम्यान, याचे पैसे तुम्हाला हप्त्यांमध्येही देता येतील.