Lokmat Money > बिझनेस न्यूज > "आजही ऑफिसमध्ये कामाच्या..," नारायण मूर्तीच्या वक्तव्यावर अशनीर ग्रोव्हरची तिखट प्रतिक्रिया

"आजही ऑफिसमध्ये कामाच्या..," नारायण मूर्तीच्या वक्तव्यावर अशनीर ग्रोव्हरची तिखट प्रतिक्रिया

वाचा काय म्हटलंय अशनीर ग्रोव्हर यांनी...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 09:33 AM2023-10-31T09:33:58+5:302023-10-31T09:34:40+5:30

वाचा काय म्हटलंय अशनीर ग्रोव्हर यांनी...

bharat pe former Ashneer Grover s scathing reaction to infosys Narayan Murthy s statement on 70 hours working office | "आजही ऑफिसमध्ये कामाच्या..," नारायण मूर्तीच्या वक्तव्यावर अशनीर ग्रोव्हरची तिखट प्रतिक्रिया

"आजही ऑफिसमध्ये कामाच्या..," नारायण मूर्तीच्या वक्तव्यावर अशनीर ग्रोव्हरची तिखट प्रतिक्रिया

गेल्या दोन-तीन दशकांत आर्थिक आघाडीवर चांगली कामगिरी करणाऱ्या देशांशी स्पर्धा करण्यासाठी भारताला आपली कार्यसंस्कृती बदलावी लागेल. यासाठी तरुणांनी कामात जास्त वेळ घालवला पाहिजे, असा सल्ला इन्फोसिसचे सहसंस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी दिला होता. त्यांच्या या व्यक्तव्यावर निरनिराळ्या स्तरातून निरनिराळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काही जणांनी त्यांच्या या वक्तव्याचं समर्थन केलंय. तर काही जणांनी याचा विरोध केला. आता भारत पे चे माजी सहसंस्थापक अशनीर ग्रोव्हर यांनी नारायण मूर्तींच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

अशनीर ग्रोव्हर यांनी यासंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. "नारायण मूर्ती यांचं वक्तव्य लोकांना आवडलं नसेल. कारण आजही ऑफिसमध्ये कामाच्या परिणामांऐवजी तासांना महत्त्व दिलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना असं वाटतं की तरुणांचा आळस ही भारताला विकसित होण्यापासून रोखणारी एकमेव गोष्ट आहे," अशी प्रतिक्रिया अशनीर ग्रोव्हर यांनी दिली.



काय म्हणाले होते नारायण मूर्ती
 “भारताची काम उत्पादकता जगात सर्वात कमी आहे. जोपर्यंत आपण सरकारी पातळीवरील भ्रष्टाचार कमी करत नाही आणि नोकरशाहीतील दिरंगाईला आळा घालत नाही, तोपर्यंत आपण ज्या देशांनी प्रचंड प्रगती केली आहे त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाही. मी तरुणांना आवाहन करतो की, पुढे येऊन म्हणा, हा माझा देश आहे. मला आठवड्यातून ७० तास काम करायला आवडेल. दुसऱ्या महायुद्धानंतर जपान आणि जर्मनीने हे केलं होतं," असं नारायण मूर्ती म्हणाले होते.

ओलाच्या सीईओंचा पाठिंबा
"कामात अनेक तास घालवा. फक्त ७० तास नाही तर १४० तासांपेक्षा जास्त काम करा. ओनली फन, नो वीकेंड..," असं म्हणत ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी नारायण मूर्ती यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला होता. 

Web Title: bharat pe former Ashneer Grover s scathing reaction to infosys Narayan Murthy s statement on 70 hours working office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.