Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता घरबसल्या मागवा डिझेल, BPCLची जबरदस्त सुविधा

आता घरबसल्या मागवा डिझेल, BPCLची जबरदस्त सुविधा

सध्या ऑनलाइनचा जमाना आहे. प्रत्येक गोष्ट आपण ऑनलाइन पद्धतीनं मागवत असतो. डिझेलही ऑनलाइन पद्धतीनं मागवता येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 09:36 PM2019-12-04T21:36:53+5:302019-12-04T21:37:00+5:30

सध्या ऑनलाइनचा जमाना आहे. प्रत्येक गोष्ट आपण ऑनलाइन पद्धतीनं मागवत असतो. डिझेलही ऑनलाइन पद्धतीनं मागवता येणार आहे.

Bharat Petroleum now has launches mobile fuel delivery in Noida | आता घरबसल्या मागवा डिझेल, BPCLची जबरदस्त सुविधा

आता घरबसल्या मागवा डिझेल, BPCLची जबरदस्त सुविधा

नवी दिल्लीः सध्या ऑनलाइनचा जमाना आहे. प्रत्येक गोष्ट आपण ऑनलाइन पद्धतीनं मागवत असतो. जेवण, मोबाइल आणि कपडे इत्यादींची ऑर्डर ऑनलाइन देता येते. पण आता डिझेलही ऑनलाइन पद्धतीनं मागवता येणार आहे. देशातली सर्वात मोठी कंपनी असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड(बीपीसीएल)ने नोएडामध्ये मोबाइल पेट्रोल पंप सुरू केला आहे. दिल्ली-एनसीआरमधला हा पहिला पेट्रोल पंप आहे, जो घरबसल्या डिझेल उपलब्ध करून देणार आहे. कंपनीनं या सेवेला नोएडातल्या शहीद रामेंद्र प्रताप सिंह पेट्रोल पंपापासून सुरुवात केली आहे. 

बीपीसीएलच्या मते, डिझेलच्या होम डिलीव्हरी सेवेचा लाभ नोएडा, ग्रेटर नोएडा आणि आजूबाजूच्या परिसरातल्या हाऊसिंग सोसायटी, मॉल, छोटे-मोठे रुग्णालय, बँक, मोठं ट्रान्सपोर्टर, कन्स्ट्रक्शन साइट, इंडस्ट्रीला मिळणार आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही. 'फिल नाऊ ऍप'च्या माध्यमातून ग्राहकाला घरबसल्या डिझेल उपलब्ध करून दिलं जाणार आहे. ऍपच्या माध्यमातून डिझेल मागवण्यासाठी कमीत कमी 100 लिटरची बुकिंग करावी लागणार आहे. मोबाइल पेट्रोल पंपाचा 4000 लीटरचा फ्युएल टँक आहे. ही सेवा इंडस्ट्रियल, मॉल, रुग्णालय आदी ठिकाणांहून सुरू केली जाणार आहे. सरकार लवकरच ही योजना सामान्य माणसांसाठी सुरू करणार आहे. या योजनेचा उद्देश पारदर्शक पद्धतीनं घरोघरी डिझेल पोहोचवण्याचा आहे. 

यात कोणतीही छेडछाड करता येणार नाही, कारण हे मोबाइल पेट्रोल पंप जिओ फेसिंग तंत्रज्ञानाशी जोडलेलं आहे. यासाठी रीफिलिंगची सुविधाही मिळणार आहे. परंतु मध्येच याचा कुठेही वापर करता येणार नाही. गुगल प्ले स्टोअर आणि आयओएसवरून फिल नाऊ एप डाऊनलोड करावं लागणार आहे. त्यानंतर हे ऍप लोकेशन ट्रॅकिंगचा पर्याय देणार आहे. हा पर्याय निवडण्यासाठी लोकेशन कंपनी सर्व्हरबरोबर जोडली जाणार आहे. त्यानंतर आपण सहजरीत्या डिझेल मागवू शकता.  
 

Web Title: Bharat Petroleum now has launches mobile fuel delivery in Noida

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.