Join us

'जीएसटी'च्या जाचक स्वरुपाविरोधात २६ फेब्रुवारीला 'भारत व्यापार बंद'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 6:52 PM

Bharat Vyapar Bandh कॉन्फडरेशन ऑफ़ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)ने येत्या २६ फेब्रुवारी रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे.

अकोला : वस्तू व सेवा कर (जीएसटी)मधील जाचक तरतुदींच्या निषेधार्थ कॉन्फडरेशन ऑफ़ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)ने येत्या २६ फेब्रुवारी रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे. या बंदला पाठिंबा देत वाहतुक क्षेत्रातील सर्वात मोठी संघटना ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफ़ेअर असोसीएशनने ६ फेब्रुवारी रोजी देशभरात 'चक्का जाम' करण्याची घोषणा केली आहे. नागपूर येथे सोमवारपासून प्रारंभ झालेल्या राष्ट्रीय व्यापार संमेलनात 'कॅट' चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया, राष्ट्रीय महामंत्री प्रविण खंडेलवाल व ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफ़ेअर असोसीएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप सिंघल यांनी याबाबतची घोषणा केली.

जीएसटी परिषदेने आपल्या हीतासाठी जीएसटीला विकृत रुप दिल्यामुळे ही प्रणाली पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप भरतीया व खंडेलवाल यांनी केला. जीएसटीच्या मुळ स्वरुपाशी छेडछाड करण्यात आली आहे. सर्व राज्य सरकारांना केवळ आपल्या वैयक्तीक स्वार्थ साधायचा आहे. त्यांना कर प्रणालीच्या सुसुत्रीकरणाची कोणतीही काळजी नाही. व्यापारी व्यापार करण्याऐवजी जीएसटीचे पालन करण्यातच गुंतलेले आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी हे चांगले नाही. त्यामुळे जीएसटीच्या वर्तमान स्वरुपाबाबत पुन्हा नव्याने विचार करण्याची गरज असल्याचे भरतीया व खंडेलवाल म्हणाले. 'कॅट'ने वारंवार उपस्थित केलेल्या मुद्यांची जीएसटी परिषदेने दखल घेतली नाही. त्यामुळे आपले म्हणने देशासमोर मांडण्यासाठी भारत व्यापार बंदचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :व्यवसायजीएसटीसंप