आपला उद्योग, कंपनी मोठी करण्यासाठी बिझनेसमन काय काय ट्रीक वापरतात. कुठे ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर, लकी ड्रॉ, युरोपची टूर अशा एकसोएक ऑफर देत असतात. तर काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना काहीबाही गिफ्ट देत असतात. गुजरातचा हिरे व्यापारी दरवर्षी आपल्या कर्मचाऱ्यांना कारपासून, फ्लॅटपर्यंत गिफ्ट देत असतो. अशीच एक भन्नाट ऑफर घेऊन भारतीय कंपनीने मोठी प्रगती करण्याचा प्लॅन आखला आहे. (BharatPe giving 75% salary hike to tech team, BMW bikes to new joinees)
BharatPe (भारतपे) नावाची टेक स्टार्टअप कंपनी आपल्याकडे चांगल्यातले चांगले कर्मचारी येण्यासाठी भन्नाट प्रयोग करत आहे. वास्तविक कंपन्या कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स पाहून वर्षा, दोन वर्षांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पैसे देत असतात. परंतू ही कंपनी त्यांची नोकरी जॉईन करताच BMW, KTM, Jawa सारख्या लाखोंच्या बाईक नव्या कर्मचाऱ्यांना देत आहे.
BharatPe ने आपल्या या नव्या कर्मचाऱ्यांसाठी बाईक पॅकेज आणि गॅजेट पॅकेज असे दोन पर्याय ठेवले आहेत. म्हणजे ज्यांना बाईकमध्ये इंटरेस्ट नाही, ते नोकरी जॉईन करताना आयफोन, कॅमेरा, आयपॅड किंवा अन्य कोणतेही गॅजेट निवडू शकतात.
100 लोकांना नोकरी
भारत पे ने सांगितले की, आपली टेक्नॉलॉजी टीम वाढवून तिप्पट करणार आहेत. यामुळे आणखी 100 लोकांना नोकरीवर ठेवण्यात येणार आहे.
बाईक पॅकेजमध्ये पाच मोटारसायकली
ये बाइक मिल रही हैं BMW G310R, KTM Duke 390, Jawa Perak, KTM RC 390, Royal Enfield Himalayan या बाईक आहेत. यापैकी केटीएम आरसीची किंमत सर्वाधिक 2.77 लाख रुपये आहे. बीएमडब्ल्यू जी 310 आर ची किंमत 2.50 लाख रुपये आहे.
गॅजेट पॅकेजमध्ये काय?
ज्या लोकांनी गॅजेट पॅकेज निवडले आहे ते देखील निराश होणार नाहीत. यामध्ये बोस हेटफोन, अॅपल आयपॅड प्रो, हरमन कार्डन स्पीकर, WHF डेस्क आणि खुर्ची, सॅमसंग गॅलेक्सी वॉच, फायरफॉक्स टायफून 27.5 डी सायकल आदी सहभागी आहेत.