Lokmat Money > बिझनेस न्यूज > Zomato चे शेअर्स आपटले; Ashneer Grover नं घेतली फिरकी, म्हणाला, “४५० रूपयांवर गेले असते जर…”

Zomato चे शेअर्स आपटले; Ashneer Grover नं घेतली फिरकी, म्हणाला, “४५० रूपयांवर गेले असते जर…”

ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचे शेअर्स आज पुन्हा १० टक्क्यांपर्यंत गडगडले. त्यानंतर अशनीर ग्रोव्हरनं फिरकी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 01:31 PM2022-07-26T13:31:33+5:302022-07-26T13:32:19+5:30

ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचे शेअर्स आज पुन्हा १० टक्क्यांपर्यंत गडगडले. त्यानंतर अशनीर ग्रोव्हरनं फिरकी घेतली.

bharatpe shark tank judge ashneer grover says zomato shares broke if the deal was done swiggy then stock price at 450 rupee | Zomato चे शेअर्स आपटले; Ashneer Grover नं घेतली फिरकी, म्हणाला, “४५० रूपयांवर गेले असते जर…”

Zomato चे शेअर्स आपटले; Ashneer Grover नं घेतली फिरकी, म्हणाला, “४५० रूपयांवर गेले असते जर…”

Ashneer Grover On Zomato Stock: ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचे शेअर्स आज १० टक्क्यांपर्यंत गडगडले. तसंत इन्ट्रा डे ट्रेडमध्ये आतापर्यंत सर्वात किमान पातळीपर्यंत ते पोहोचले. यानंतर भारतपेचे माजी संस्थापक आणि शार्क टँक इंडियाचे जज अशनीर ग्रोव्हर यांनी ट्वीटरवर फिरकी घेतली. झोमॅटोमध्ये Blinkit ऐवजी Swiggy चं विलिनीकरण झाले असते, तर शेअर वाढून ४५० रूपयांपर्यंत पोहोचला असता.

२३ जुलै रोजी प्री आयपीओ शेअरधारकांचा लॉक इन पीरिअड संपल्यानंतर सोमवारी झोमॅटोचे शेअर्स ऑल टाईम लो लेव्हलवर आले होते. दरम्यान, यानंतर अशनीर ग्रोव्हरनं कंपनीची फिरकी घेतली. जर त्यांनी स्विगीचं मर्जर केलं असतं तर हा स्टॉक आज ४५० रूपयांचा असता, असं अशनीर म्हणाला.


लॉक इन संपला
लॉक-इन कालावधी ठराविक गुंतवणूकदारांसाठी असतो. जेव्हा जेव्हा स्टॉकच्या मोठ्या टक्क्याचे लॉक-इन संपते तेव्हा ते गुंतवणूकदार त्यांचे शेअर्स विकू शकतात. लॉक-इन कालावधीपूर्वी ते त्यांचे शेअर्स विकू शकत नाहीत. अशा स्थितीत जर गुंतवणूकदारांनी तो शेअर विकायला सुरुवात केली तर त्याच्या किंमतीत मोठी घसरण होऊ शकते. पण गुंतवणूकदारांनी शेअर्स विकलेच पाहिजेत असे नाही. गेल्या तीन महिन्यांत या शेअरच्या किंमतीत ३३ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १६८.६५ रुपये आहे.

२३ जुलै २०२१ रोजी झोमॅटोचे शेअर्स शेअर बाजारावर लिस्ट करण्यात आले होते. आयपीओतील गुंतवणूकदारांना हे शेअर्स ७६ रूपये प्रति शेअर दरानं मिळाले होतं.तर बीएसईवर हे शेअर ११५ रूपयांवर लिस्ट झाले होते.

Web Title: bharatpe shark tank judge ashneer grover says zomato shares broke if the deal was done swiggy then stock price at 450 rupee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.