Ashneer Grover On Zomato Stock: ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचे शेअर्स आज १० टक्क्यांपर्यंत गडगडले. तसंत इन्ट्रा डे ट्रेडमध्ये आतापर्यंत सर्वात किमान पातळीपर्यंत ते पोहोचले. यानंतर भारतपेचे माजी संस्थापक आणि शार्क टँक इंडियाचे जज अशनीर ग्रोव्हर यांनी ट्वीटरवर फिरकी घेतली. झोमॅटोमध्ये Blinkit ऐवजी Swiggy चं विलिनीकरण झाले असते, तर शेअर वाढून ४५० रूपयांपर्यंत पोहोचला असता.
२३ जुलै रोजी प्री आयपीओ शेअरधारकांचा लॉक इन पीरिअड संपल्यानंतर सोमवारी झोमॅटोचे शेअर्स ऑल टाईम लो लेव्हलवर आले होते. दरम्यान, यानंतर अशनीर ग्रोव्हरनं कंपनीची फिरकी घेतली. जर त्यांनी स्विगीचं मर्जर केलं असतं तर हा स्टॉक आज ४५० रूपयांचा असता, असं अशनीर म्हणाला.
२३ जुलै २०२१ रोजी झोमॅटोचे शेअर्स शेअर बाजारावर लिस्ट करण्यात आले होते. आयपीओतील गुंतवणूकदारांना हे शेअर्स ७६ रूपये प्रति शेअर दरानं मिळाले होतं.तर बीएसईवर हे शेअर ११५ रूपयांवर लिस्ट झाले होते.