Lokmat Money > बिझनेस न्यूज > भार्गव भट यांना 'इन्फोसिस प्राईज २०२३' अवॉर्ड, सहा प्रवर्गामध्ये पुरस्कारांची घोषणा

भार्गव भट यांना 'इन्फोसिस प्राईज २०२३' अवॉर्ड, सहा प्रवर्गामध्ये पुरस्कारांची घोषणा

भारतातील शास्त्रशुद्ध संशोधनामध्ये लक्षणीय योगदान देणाऱ्या सहा व्यक्तींना पुरस्कार 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 01:15 PM2023-11-16T13:15:24+5:302023-11-16T13:17:21+5:30

भारतातील शास्त्रशुद्ध संशोधनामध्ये लक्षणीय योगदान देणाऱ्या सहा व्यक्तींना पुरस्कार 

Bhargava Bhat awarded Infosys Prize 2023 Awards Announced in Six Categories narayan murthy | भार्गव भट यांना 'इन्फोसिस प्राईज २०२३' अवॉर्ड, सहा प्रवर्गामध्ये पुरस्कारांची घोषणा

भार्गव भट यांना 'इन्फोसिस प्राईज २०२३' अवॉर्ड, सहा प्रवर्गामध्ये पुरस्कारांची घोषणा

बंगळुरू : इन्फोसिस सायन्स फाउंडेशनने (आयएसएफ) गुरुवारी इन्फोसिस प्राईझ २०२३ ह्या पारितोषिकांची घोषणा केली. इंजिनीअरिंग व कम्प्युटर सायन्स, ह्युमॅनिटीज (मानवशास्त्र), लाइफ सायन्सेस (जीवनशास्त्र), मॅथेमॅटिकल सायन्सेस (गणितविषयक शास्त्र), फिजिकल सायन्सेस (भौतिकशास्त्र) आणि सोशल सायन्सेस (सामाजिक शास्त्र) अशा सहा प्रवर्गांमध्ये ही पारितोषिकं जाहीर करण्यात आली आहेत. २००८ सालापासून ही इन्फोसिस पारितोषिके दिली जात आहेत.

भारतावर प्रभाव टाकणाऱ्या शास्त्रीय संशोधनात व विद्वत्तेत योगदान दिल्याबद्दल त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. प्रत्येक प्रवर्गातील पारितोषिकामध्ये सुवर्णपदक, मानपत्र आणि १००,००० डॉलर्स (किंवा ह्या मूल्याची भारतीय रुपयांतील रक्कम) ह्यांचा समावेश आहे. इन्फोसिस सायन्स फाउंडेशनच्या बंगळुरू येथील कार्यालयात हा सोहळा पार पडला. परिक्षकांच्या आंतरराष्ट्रीय मंडळाने २२४ नामांकनांमधून इन्फोसिस प्राइझ २०२३च्या विजेत्यांची निवड केली आहे.

भार्गव भट यांची निवड
मॅथेमॅटिकल सायन्सेस प्रवर्गातील इन्फोसिस प्राइझ २०२३साठी, प्रिन्सटन युनिव्हर्सिटीतील तसेच इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स स्टडीजमधील फेर्नहोल्झ जॉइंट प्रोफेसर भार्गव भट ह्यांची निवड झाली आहे. अरिथमेटिक जॉमेट्री आणि कम्युटेटिव अल्जिब्रा ह्या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट व पायाभूत योगदान दिल्याबद्दल त्यांना हे पारितोषिक जाहीर झाले. 

कोण आहेत पुरस्कार विजेते?
इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर सायन्स प्रवर्गातील पुरस्कार आयआयटी कानपूरमधील सस्टेनेबल एनर्जी इंजिनीअरिंगचे (एसईई) प्राध्यापक सच्चिदानंद त्रिपाठी याना प्रदान करण्यात आला. तर ह्युमॅनिटीजमधील पुरस्कार बंगळुरू येथील सायन्स गॅलरीच्या संस्थापक संचालक जान्हवी फाळके याना देण्यात आला.

लाइफ सायन्सेस प्रवर्गातील पुरस्कार आयआयटी कानपूरमधील बायोलॉजिकल सायन्सेस व बायोइंजिनिअरिंग विषयांचे प्राध्यापक अरुणकुमार शुक्ला यांना, तर फिजिकल सायन्सेसमधील पुरस्कार नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेसमधील बायोकेमिस्ट्री, बायोफिजिक्स व बायोइन्फोरमॅटिक्स विषयांतील प्राध्यापक मुकुंद थट्टाई यांना प्रदान करण्यात आला. तर सोशल सायन्सेस प्रवर्गातील इन्फोसिस प्राइझ २०२३, कोलंबिया युनिव्हर्सिटीतील राज्यशास्त्राच्या प्राध्यापक करुणा मँटेना यांना देण्यात आला.

Web Title: Bhargava Bhat awarded Infosys Prize 2023 Awards Announced in Six Categories narayan murthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.