मोबाइल ग्राहकांच्या संख्येच्या बाबतीत, रिलायन्स जिओ नंतर भारती एअरटेलचा क्रमांक येतो. एअरटेल आपल्या ग्राहकांना विविध वैधतेचे अनेक प्लॅन देते. कंपनीच्या काही प्लॅन्सची किंमत जवळपास सारखीच आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना योग्य प्लॅन निवडणे अवघड होते. आज आम्ही एअरटेलच्या अशाच एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही 1 रुपया कमी देऊनही दुप्पट डेटा मिळवू शकता. या प्लॅनची किंमत 298 रुपये आहे, जी 299 रुपयांच्या तुलनेत अधिक डेटा आणि जवळपास समान वैधता देते.
Airtel चा 299 चा प्लॅन
299 रूपयांच्या एअरटेलच्या प्लॅनमध्ये ३० दिवसांची वैधता मिळते. तसंच या प्लॅनसोबत ग्राहकांना 30 जीबी डेटा देण्यात येतो. तसंच हा डेटा कोणत्याही डेली लिमिटशिवाय मिळतो. या डेटाचा वापर ३० दिवसांमध्ये कधीही करता येतो. प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसही देण्यात येतात. याशिवाय यात ग्राहकांना Prime Video Mobile Edition, Free Hellotunes आणि Wynk Music चा मोफत अॅक्सेसही देण्यात येतो.
Airtel चा 298 चा प्लॅन
या प्लॅनची वैधताही जवळपास महिनाभराची आहे. या प्लॅनसोबत ग्राहकांना 28 दिवसांची वैधता आणि दररोज 2 जीबी डेटा देण्यात येतो. यानुसार ग्राहकांना महिनाभरात 56 जीबी डेटा मिळतो. तसंच अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 एसएमएसही देण्यात येतात. याशिवाय ग्राहकांना Prime Video Mobile Edition, Free Hellotunes आणि Wynk Music चं सबस्क्रिप्शनही मिळतं. दोन्ही प्लॅन जवळपास समान किंमतीचे असले तरी यात केवळ डेटाचा फरक आहे. एका प्लॅनमध्ये कोणत्याही डेली लिमिटशिवाय 30 जीबी डेटा मिळतो. तर दुसऱ्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबी प्रमाणे 56 जीबी डेटा देण्यात येतो.