Bharti Airtel Stops Validity Loan Feature : देशात मोबाईल नेटवर्क क्षेत्रात स्टारलिंकचे मालक इलॉन मस्क यांच्या एन्ट्रीनंतर बाजारात तगडी स्पर्धा निर्माण झाली आहे. मस्कच्या कंपनीशी दोन हात करण्यासाठी एकमेकांचे स्पर्धक जिओ आणि एअरटेल एकत्र आलेत. त्यामुळे भिवष्यात रिचार्जचे दर कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. भारती एअरटेल लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. देशभरातील सुमारे ३९ कोटी लोक एअरटेलचे नेटवर्क वापरतात. तुम्हीही एअरटेल यूजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. वास्तविक, एअरटेलने त्यांची एक सेवा बंद केली आहे.
ही सेवा एअरटेलची वैधता कर्ज सेवा आहे. एअरटेलने आता आपल्या ग्राहकांना वैधता कर्ज देणे बंद केले आहे. एअरटेलच्या या सेवेसाठी लोकांना कोणतेही पैसे मोजावे लागले नाहीत. एअरटेलची वैधता कर्ज सेवा केवळ काही क्षेत्रांमध्ये सक्रिय होती. यामध्ये राजस्थान, केरळ, बिहार, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांचा समावेश होता. मात्र, आतापासून ही सेवा कोणत्याही भागात उपलब्ध होणार नाही. एअरटेलने ही सेवा सर्वत्र बंद करण्याचा निर्मय घेतला आहे.
डेटा लोन ऑफर सुरू राहणार
एअरटेल आपली डेटा लोन ऑफर सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवणार आहे. डेटा लोन ऑफर ही एक आपत्कालीन सुविधा आहे, ज्यामध्ये ग्राहकांना १ दिवसासाठी १GB डेटा दिला जातो. ग्राहकाने रिजार्ज केल्यानंतर हा डेटा कंपनी पुन्हा परत घेते. या सुविधेसाठी कंपनी कुठलेही शुल्क आकारत नाही.
BSNL ने कात टाकली
काही दिवसांपूर्वी सरकारी कंपनी बीएसएनएलने टाटा कंपनीशी हातमिळवणी केली आहे. लवकरच कंपनी 4G आणि 5G सेवा सुरू करणार आहे. टाटाच्या एन्ट्रीने मोठ्या प्रमाणात ग्राहक BSNL मध्ये जात आहेत. सध्याच्या घडीला सर्वात स्वस्त प्लॅन बीएसएनएल कंपनी देत आहे. त्यामुळे आगामी काळात जिओ, एअरटेल आणि व्हिआयसमोर मोठं आव्हान असणार आहे. अशात आता इलॉन मस्कनेही भारतात प्रवेशाची तयारी सुरू केली आहे. बाजारातील या स्पर्धेचा ग्राहकांना फायदा होण्याची शक्यता आहे.