सरकारी इंजिनिअरिंग कंपनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडला (BHEL) एक मोठी वर्क ऑर्डर मिळाली आहे. कंपनीला अदानी पॉवरकडून ही ऑर्डर मिळाल्याची माहिती समोर आलीये. छत्तीसगडमधील रायगढ येथे १,६०० मेगावॅटचा रायगड स्टेज-२ थर्मल पॉवर प्लांट उभारण्यासाठी कंपनीला अदानी पॉवर लिमिटेडकडून ४,००० कोटी रुपयांची ऑर्डर मिळालीये. बीएचईएलनं स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये यासंदर्भातील माहिती दिली. छत्तीसगडमधील रायगढ फेज-2 येथे अति महत्त्वाच्या तंत्रज्ञानावर आधारित २x८०० MW क्षमतेच्या प्रकल्पासाठी उपकरणांचा पुरवठा, बांधकाम आणि ऑपरेशनचे पर्यवेक्षण यासाठी २७ मार्च २०२४ रोजी ऑर्डर मिळाली असल्याचं यात नमूद करण्यात आलंय.
मार्च महिन्यात बीएचईएलला मिळालील ही दुसरी मोठी ऑर्डर आहे आणि या वर्षातील चौथी ऑर्डर आहे. या ऑर्डरनुसार बीएचईएल बॉयलर, टर्बाइन, जनरेटरसारखी उपकरणं सप्लाय करेल आणि सुपरक्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित २x800 मेगावॅट वीज प्रकल्पाची निर्मिती आणि कमिशनिंगवर देखरेख करेल.
अनेक कंत्राटांचा समावेश
या महिन्याच्या सुरुवातीला, भेलनं उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात सिंगरौली सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट, स्टेज-III (२x८०० MW) ची स्थापना करण्यासाठी एनटीपीसीकडून ₹९,५०० कोटी रुपयांची ऑर्डर जिंकली होती. या प्रकल्पासाठी भेल ही एकमेव बोलीदार असल्याचं सांगण्यात आलं होतं. याशिवाय कंपनीला तालाबीरा पॉवर प्रोजेक्टसाठी एनएलसी इंडियाकडून १५००० कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळाली आहे.
३०० पर्यंत जाणार शेअर
येणाऱ्या काळात कंपनीचा शेअर ३०० रुपयांच्या लेव्हलपर्यंत पोहोचू शकतो असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलाय. कंपनीला सातत्यानं मिळत असलेली ऑर्डर्स यामागील कारण असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)