ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - कॅशलेस व्यवहाराला चालना मिळावी यासाठी केंद्र सरकारने लॉन्च केलेल्या भिम अॅपने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. तब्बल 1 कोटी 70 लाख वेळेस हे अॅप डाउनलोड करण्यात आलं आहे. हा एक विश्वविक्रम आहे. नीति आयोगाचे सीआओ अमिताभ कांत यांनी याबाबत माहिती दिली.
गेल्या वर्षी 30 डिसेंबरला हे अॅप लॉन्च करण्यात आलं होतं. विना इंटरनेटही हे अॅप वापरता येतं हे या अॅपचं वैशिष्ट्य आहे. फोनमध्ये USSD कोड *99# डायल करूनही हे अॅप वापरता येतं. हे अॅप नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने डेव्हलप केलं आहे.
लॉन्चिंगच्या केवळ 3 दिवसातच गुगल प्ले स्टोरवर फ्री अॅपच्या तक्त्यात भिम अॅप अग्रस्थानी पोहोचलं होतं. तर एका महिन्यात 50 लाख जणांनी हे अॅप डाउनलोड केलं होतं.
#BHIMApp is doing very well, it got 17 million downloads it is a world record: Amitabh Kant, NITI Aayog, CEO pic.twitter.com/eGw3OQ8hry
— ANI (@ANI_news) February 25, 2017