Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘बीएचआर’कडून १९६१ च्या आयकर कायद्याचे उल्लंघन

‘बीएचआर’कडून १९६१ च्या आयकर कायद्याचे उल्लंघन

भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) मल्टीस्टेट पतसंस्थेत कर्ज प्रक्रिया तसेच अन्य कामकाजादरम्यान आयकर कायद्याचे उल्लंघन झाल्याचा ठपका

By admin | Published: February 9, 2015 11:52 PM2015-02-09T23:52:19+5:302015-02-09T23:52:19+5:30

भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) मल्टीस्टेट पतसंस्थेत कर्ज प्रक्रिया तसेच अन्य कामकाजादरम्यान आयकर कायद्याचे उल्लंघन झाल्याचा ठपका

'BHR' violates the Income-tax Act of 1961 | ‘बीएचआर’कडून १९६१ च्या आयकर कायद्याचे उल्लंघन

‘बीएचआर’कडून १९६१ च्या आयकर कायद्याचे उल्लंघन

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) मल्टीस्टेट पतसंस्थेत कर्ज प्रक्रिया तसेच अन्य कामकाजादरम्यान आयकर कायद्याचे उल्लंघन झाल्याचा ठपका लेखा परीक्षणात ठेवण्यात आला आहे. यासह खातेदारांची ओळख निश्चितीसाठी राबविण्यात येणाऱ्या केवायसी निकषांचीदेखील पूर्तता झाली नसल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
बीएचआर पतसंस्थेत आयकर कायदा १९६१ मधील विविध कलमांतर्गत उल्लंघन झाले असल्याने जबाबदार संस्था व व्यक्तीवर आयकर विभागामार्फत कारवाई आवश्यक असल्याचे लेखापरीक्षण अहवालात नमूद केले आहे.
आयकर कायद्यानुसार उल्लंघन
१) २६९-एस.एस. : २० हजार व त्यापुढील रोखीची रक्कम केवळ बचत खात्यामध्ये रेखांकीत धनादेशाने घेऊनच ठेवी होणे अभिप्रेत असताना बेनामी व्यवहारामुळे या कलमास अभिप्रेत मूळ कृती घडलेली नाही.
२) २६९-टी : २० हजार व त्यापुढील ठेव व कर्ज रक्कम केवळ बचत खात्यांमध्ये रेखांकीत धनादेशानेच संस्थेने संबधितास अदा करणे अभिप्रेत असताना या कलमास अभिप्रेत मूळ कृती घडलेली नाही.
३) २७१-डी : २० हजार व त्यापुढील रोख रक्कम स्वीकारताना व अदा करताना बचत खात्यामध्ये न घेता व्यवहार केल्याने जेवढ्या रकमेचा व्यवहार घडला आहे, तेवढ्या रकमेच्या दंडाची तरतूद असल्याने अशी कारवाई संबधितांवर होणे आवश्यक असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
४)६८,६९,६९-अ‍े : रोख निधीचा उगम व स्वरूप, तसेच त्याची गुंतवणूक यांची माहिती न पुरविता खात्यामध्ये जमा व वितरीत रोख रकमा निदर्शनास आलेल्या आहेत. अशा बहुतांश व्यक्ती व व्यवहार बेनामी व बेहिशोबी असल्याने या कलमास अभिप्रेत मूळ कृती घडलेली नाही.
५) ६९-सी : रोख निधीचा उगम, आवक, उधृत करता असे खर्च संबंधित बेनामी व्यक्तीकडून नोंदवले गेले असणार आहेत. त्यामुळे असा बेहिशोबी खर्च हा संबंधिताचे उत्पन्न म्हणून घोषित करण्याची तरतूद असल्याने या कलमास अभिप्रेत मूळ कृती घडलेली नाही.

Web Title: 'BHR' violates the Income-tax Act of 1961

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.