Lokmat Money > बिझनेस न्यूज > RBI ची मोठी कारवाई, PNB आणि फेडरल बँकेला मोठा दंड; काय आहे कारण?

RBI ची मोठी कारवाई, PNB आणि फेडरल बँकेला मोठा दंड; काय आहे कारण?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) देशातील सर्व बँकांच्या कामकाजावर लक्ष ठेवते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 10:30 AM2023-11-04T10:30:34+5:302023-11-04T10:31:17+5:30

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) देशातील सर्व बँकांच्या कामकाजावर लक्ष ठेवते.

Big action by RBI huge fines for PNB and Federal Bank What is the reason details | RBI ची मोठी कारवाई, PNB आणि फेडरल बँकेला मोठा दंड; काय आहे कारण?

RBI ची मोठी कारवाई, PNB आणि फेडरल बँकेला मोठा दंड; काय आहे कारण?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) देशातील सर्व बँकांच्या कामकाजावर लक्ष ठेवते. जेव्हा जेव्हा एखादी बँक रिझर्व्ह बँकेच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन आपलं कामकाज करते तेव्हा रिझर्व्ह बँक त्यावर दंड आकारू शकते. दरम्यान, रिझर्व्ह बँकेनं आता पंजाब नॅशनल बँक (PNB), फेडरल बँक, मर्सिडिज बेंझ फायनान्शिअल सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Mercedes Benz Financial Services India Private Limited) आणि कोसामट्टम फायनान्स लिमिडेटला (Kosamttam Finance Limited, Kottayam) वर दंड ठोठावला आहे. नियमांचे पालन न केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँकेनं शुक्रवारी यासंदर्भातील माहिती दिली. रिझर्व्ह बँकेनं पीएनबीवर ७२ लाख रुपये आणि फेडरल बँकेवर ३० लाख रुपये दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेनं मर्सिडीज बेंझ फायनान्शियल सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडवर आपल्या केवायसी निर्देश, २०१६ च्या काही तरतुदींचं पालन न केल्याबद्दल १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. 



याशिवाय कोसामट्टम फायनान्स लिमिटेड, कोट्टायमवर नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी सिस्टमॅटिकली इंपॉर्टंट नॉन डिपॉझिट टेकिंग कंपनीज आणि डिपॉझिट टेकिंग कंपनी (रिझर्व्ह बँक) निर्देश २०१६ च्या काही तरतुदींचं पालन न केल्यानं १३.३८ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Web Title: Big action by RBI huge fines for PNB and Federal Bank What is the reason details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.