Join us  

TATA समूहाची मोठी घोषणा, UK मध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक करणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 7:06 PM

टाटा स्टीलने आज ब्रिटिन सरकारसोबत वेल्स पोर्ट टालबोट स्टील प्लांटमध्ये मोठ्या गुंतवणूकीसंदर्भात महत्वाचा करार केला आहे. यांतर्गत यूके सरकार टाटा स्टीलला सब्सिडीही देणार आहे. 

टाटा समूह यूके अर्थात ब्रिटनमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. टाटा स्टील (Tata Steel) आणि ब्रिटन सरकारमध्ये फायनान्शिअल पॅकेजसाठी सहमतीही झाली आहे. टाटा स्टीलने आज ब्रिटिन सरकारसोबत वेल्स पोर्ट टालबोट स्टील प्लांटमध्ये मोठ्या गुंतवणूकीसंदर्भात महत्वाचा करार केला आहे. यांतर्गत यूके सरकार टाटा स्टीलला सब्सिडीही देणार आहे. 

यासंदर्भात माहिती देनात ब्रिटेनने शुक्रवारी घोषणा केली आहे की, आपण वेल्समध्ये देशातील सर्वात मोठ्या स्टीलवर्कसाठी टाटा स्टीलसोबत एका संयुक्त गुंतवणूक पॅकेजवर सहमती व्यक्त केली आहे.  टाटा स्टील आणि ब्रिटन सरकार यांच्यात पोर्ट टालबोट (Port Talbot) प्रोजेक्टमध्ये 1.25 अब्ज पाउंडच्या संयुक्त गुंतवणुकीसंदर्भात सहमती झाली आहे. यांपैकी 50 कोटी पाउंड अर्थात 62 कोटी डॉलर टाटा स्टीलला ग्रँट स्वरुपात मिळतील. तर उर्वरित पैसा टाटा स्टील लावेल.

प्रदूषण कमी करण्यास मदत होईल -यूकेने वेल्समधील स्टीलवर्क्ससाठी टाटा स्टीलसोबत केलेल्या संयुक्त गुंतवणूक पॅकेज करारात 500 मिलियन पाउंडपर्यंतच्या अनुदानाचा  समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, या प्रोजेक्टच्या मदतीने वेल्सच्या स्टील प्लांटमध्ये ग्रीन एनर्जीच्या वापरासंदर्भातील तंत्रज्ञान स्थापित केले जाईल. टाटा स्टीलच्या या गुंतवणूकीमुळे प्लांट चालविण्यास आणि प्रदूषण कमी करण्यात मदत मिळेल. 

विकासाची संधी -टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन या घोषणेसंदर्भात बोलताना म्हटले, “यूके सरकारसोबतचा हा करार स्टिल उद्योगाच्या भविष्यासाठी आणि यूकेतील औद्योगिक मूल्य साखळीसाठी एक निर्णायक क्षण आहे. तसेच, या प्रस्तावित गुंतवणुकीमुळे रोजगार संरक्षित होईल आणि दक्षिण वेल्समध्ये औद्योगिक विकासासाठी मोठी संधी निर्माण होईल, असेही चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :टाटाइंग्लंडगुंतवणूक