मुंबई : फ्युचर समूहातील बिग बाजारमध्ये शनिवार, ११ आॅगस्टपासून ‘महाबचत सेल’ सुरू होत आहे. स्वातंत्र्यदिनापर्यंत हा सेल सुरू असणार आहे. यंदा फ्युचर समूहातील अन्य सहा प्रकारच्या मॉल्समध्येही पहिल्यांदाच हा सेल असणार आहे.या सेलमध्ये सवलती, कॅशबॅकद्वारे बचतीच्या विविध आॅफर्स बिग बाजारने १०० शहरांमधील त्यांच्या सुपर मार्केटमध्ये ग्राहकांना देऊ केल्या आहेत. त्यात प्रामुख्याने ‘फ्युचर पे वॉलेट’ व ‘पेटीएम’द्वारे ३ हजारांच्या खरेदीवर १२०० रुपये कॅशबॅक मिळणार आहे. स्टेट बँकेच्या डेबिट कार्डवर ३ हजारांची खरेदी केल्यास १० टक्के थेट सवलत मिळेल. बटर, टूथपेस्ट, रवा, मिक्सर, लहान मुले व महिलांसाठीचे कपडे, बॅग्स, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, खाद्यान्न, किराणा, घर सजावटीचे सामान अशा वेगवेगळ्या श्रेणीतही विविध सवलती उपलब्ध असतील.यंदा या सेलची व्याप्ती वाढविली आहे. त्याअंतर्गत ब्रॅण्ड फॅक्टरी, सेंट्रल मॉल, इझिडे, निलगिरीज, हेरिटेज फ्रेश व फूडवर्ल्ड या अन्य मॉल तसेच सुपर मार्केटमध्येही ‘महाबचत सेल’ असेल. तेथेही ग्राहकांना खरेदीत विविध सवलती मिळणार आहेत.याबाबत बिग बाजारचे सीईओ सदाशिव नायक म्हणाले की, बिग बाजार ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. महाबचत सेल हा त्याचाच एक भाग आहे. यंदा सेलमध्ये ग्राहकांना अडथळ्याविना खरेदी करता येईल. बिलिंगसाठी लांब रांगेत उभे राहावे लागणार नाही. यासाठी तंत्रज्ञानावर आधारित विशेष यंत्रणा उभी करण्यात आली आहे.
‘बिग बाजार’मध्ये आता ‘महाबचत सेल’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 3:10 AM