नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने गृह कर्जात 70 बेसिस पॉईंट (0.70 टक्के) पर्यंत सवलत जाहीर केली होती. गृह कर्जावरील व्याजदर 6.70 टक्के पासून सुरू होत आहे. या सूटचा फायदा फक्त 31 मार्चपर्यंत घेता येणार आहे. (big banks including sbi offering cheaper interest rate on home loan 31 march is last date)
अशा परिस्थितीत तुम्हीही गृह कर्जाबद्दल विचार करत असाल तर या महिन्यात कर्ज घेऊ शकता. कारण, 31 मार्चनंतर हा फायदा मिळणार नाही. फक्त एसबीआय, आयसीआयसीआय, एचडीएफसी, कोटक महिंद्रा आणि देशातील अन्य मोठ्या बँकांमार्फत 31 मार्चपर्यंत स्वस्त घरांची खरेदी करण्याची संधी आहे.
योनो अॅपद्वारे मिळेल अधिक फायदा
ग्राहक जर होम लोन अॅप्लिकेशन SBI योनो अॅपची मदत घेतली तर आपल्याला अधिक फायदा मिळेल. योनोकडून अर्ज केल्यावर गृह कर्जावरील दर 6.75 टक्के राहील. आपण योनो अॅपच्या मदतीने अर्ज केल्यास आपल्याला स्वतंत्रपणे 5 बेसिस पॉईंटची सूट मिळेल.
या बँकांनीही व्याजदर कमी केले
एसबीआयच्या व्यतिरिक्त एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँकदेखील घरामध्ये सूट मिळण्याचा लाभ देत आहेत. कोटक महिंद्रा बँकेने गृह कर्जाचे व्याज 0.10 टक्क्यांनी कमी केले. या मर्यादित मुदतीत कपात झाल्यानंतर व्याजदर 6.65 टक्क्यांवर खाली आला. या कपातीसह बँकेचा दावा आहे की, ते ग्राहकांना बाजारपेठेतील सर्वात कमी व्याजदराने गृह कर्ज देतात. या बँकांनंतर आयसीआयसीआय बँकेनेही 5 मार्च रोजी 75 लाख रुपयांपर्यंत गृह कर्जावरील व्याज दर कमी करून 6.7 टक्के केले. 75 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जासाठी व्याज 6.75 टक्के असेल.
एचडीएफसी दर
एचडीएफसीने गृह कर्जावरील व्याजदरात 5 बेसिस पॉईंटने घट केलीय. विद्यमान कर्ज धारकांनाही कपातीचा लाभ मिळणार आहे. व्याजदर कपात 4 मार्चपासून लागू केली गेली आहे. रिअल इस्टेटला केंद्र आणि राज्य सरकारकडून सतत पाठिंबा दर्शविला जात आहे. या क्षेत्रात भरभराट झाल्यास अर्थव्यवस्थेला दुप्पट फायदा होईल. रिअल इस्टेटमुळे अनेक क्षेत्रात मागणी वाढेल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. अशा परिस्थितीत देशातील खासगी आणि सार्वजनिक दोन्ही बँका गृहकर्जातून लोकांना दिलासा देत आहेत. परंतु लक्षात ठेवा की, आता आपल्याकडे फक्त 1 आठवडा शिल्लक आहे.
स्वस्त ऑफर का मिळत आहे?
खरंतर, जास्त लिक्विडिटीच्या परिस्थितीत बँकांमध्ये व्याज दर स्थिर केले गेले आहेत. केअर रेटिंग्सनुसार गेल्या महिन्यापर्यंत बँकांकडे 6.5 लाख कोटी रुपयांची रोकड होती. जास्त रोकडमुळे बँकांच्या फायद्यावर परिणाम होते, कारण त्यांना ठेवीदारांना व्याज द्यावे लागते. मात्र, याचे व्याज दर 2.5 टक्क्यांच्या नीचांकावर आहे. याशिवाय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) बँकांच्या धोरण दराच्या कपातीनुसार व्याज दर कपात करण्यासाठी दबाव आणत आहे.