Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘सबसे सस्ते पांच दिन’; ‘बिग बाजारा’त प्रजासत्ताक दिनानिमित्त सवलतींचा पाऊस

‘सबसे सस्ते पांच दिन’; ‘बिग बाजारा’त प्रजासत्ताक दिनानिमित्त सवलतींचा पाऊस

प्रजासत्ताक दिनाचा आनंद खरेदीद्वारे द्विगुणित करण्यासाठी ‘बिग बाजारा’त सध्या धूम सुरू आहे. बिग बाजारने २४ ते २८ जानेवारी हे ५ दिवस ‘सबसे सस्ते पाँच दिन’ ही खास सवलत योजना सुरू केली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:39 AM2018-01-25T00:39:13+5:302018-01-25T13:56:14+5:30

प्रजासत्ताक दिनाचा आनंद खरेदीद्वारे द्विगुणित करण्यासाठी ‘बिग बाजारा’त सध्या धूम सुरू आहे. बिग बाजारने २४ ते २८ जानेवारी हे ५ दिवस ‘सबसे सस्ते पाँच दिन’ ही खास सवलत योजना सुरू केली आहे.

Big Bazaar 'Dhoom! Rainy concession on the occasion of Republic Day; Starting 'cheapest five days' | ‘सबसे सस्ते पांच दिन’; ‘बिग बाजारा’त प्रजासत्ताक दिनानिमित्त सवलतींचा पाऊस

‘सबसे सस्ते पांच दिन’; ‘बिग बाजारा’त प्रजासत्ताक दिनानिमित्त सवलतींचा पाऊस

मुंबई : प्रजासत्ताक दिनाचा आनंद खरेदीद्वारे द्विगुणित करण्यासाठी ‘बिग बाजारा’त सध्या धूम सुरू आहे. बिग बाजारने २४ ते २८ जानेवारी हे ५ दिवस ‘सबसे सस्ते पाँच दिन’ ही खास सवलत योजना सुरू केली आहे.
‘बिग बाजार’च्या देशभरातील १००हून अधिक शहरांमधील स्टोअर्समध्ये हा सेल सुरू झाला आहे. या निमित्ताने ‘बिग बाजार’ आपला १२ वा वर्धापन दिनही साजरा करीत आहे.
या सेलमध्ये ५ हजार रुपयांच्या खरेदीवर १ हजार रुपयांची सवलत व २,५०० रुपयांच्या खरेदीवर ५०० रुपयांची सवलत ‘कॅशबॅक’ स्वरूपात दिली जात आहे.
‘फ्युचर पे’ व्हॅलेटवर साइन अप करताच, तत्काळ १०० रुपये जमा होणार आहेत. पाचही दिवशी बिग बाजारचेच ‘पॉप अप’ स्टोअर्स सुपर मार्केटच्या भागात असतील. ग्राहक तेथेही आपली आॅर्डर देऊ शकतील. पेटीएम ग्राहकांसाठीही विशेष सवलत असेल.
याखेरीज पुरुषांच्या फॅशन डेनिम्स एकवर दोन मोफत स्किम असून, धान्य, किराणा, कोरयो एसी, ब्रँडेड डबल व सिंगल चादरी, काचेची गॅस शेगडी, मोबाइल्स यांवरही सवलत मिळणार आहे.
उत्सव म्हणजे सवलत-
भारतीयांचा एखादा महत्त्वाचा सण वा उत्सव असला की, ‘बिग बाजार’ तो जल्लोषात साजरा करण्यासाठी ग्राहकांसाठी कायम अशा सवलतींच्या योजना आणत असते. ग्राहकांना खरेदीचा आनंद देण्याचा ‘बिग बाजार’चा प्रयत्न असतो. ग्राहकांची सुट्टी अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न याद्वारे केला जातो, असे ‘बिग बाजार’चे सीईओ सदाशिक नायक यांनी सांगितले.

Web Title: Big Bazaar 'Dhoom! Rainy concession on the occasion of Republic Day; Starting 'cheapest five days'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.