अमेरिकेच्या सरकारनं एअर इंडियाला मोठा झटका दिला आहे. कोरोना महासाथीदरम्यान उड्डाणं रद्द होणं किंवा त्यांच्या उड्डाणांच्या वेळात झालेल्या बदलांमुळे ज्यांना फटका बसला त्यांच्या तिकिटाचे पैसे रिफंड करण्यात झालेल्या विलंबामुळे एअर इंडियावर 14 लाख डॉलर्स (11.38 कोटी) दंड ठोठावण्यात आला आहे.
अमेरिकन ट्रान्सपोर्ट विभागाने सोमवारी सांगितले की एअर इंडिया सहा एअरलाइन्सपैकी एक आहे ज्यांना परतावा म्हणून प्रवाशांना एकूण 60 कोटी डॉलर्स परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एअर इंडियाला 12.15 दशलक्ष डॉलर (988 कोटी रुपये) परत करण्यास सांगितले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की विनंती केल्यावर प्रवाशांना परतावा देण्याची तरतूद यूएस परिवहन विभागाच्या धोरणांच्या विरोधात आहे. एखादं उड्डाण रद्द झालं किंवा त्यात बदल झाल्यास विमान कंपनीला प्रवाशांच्या तिकिटांचे पैसे कायदेशीरित्या परत करावे लागतील असा अमेरिकन सरकारचा नियम आहे.
तसंच एअर इंडियानं अर्ध्यापेक्षा अधिक रिफंडच्या अर्जांवर कारवाई करताना त्यासाठी 100 दिवसांपेक्षा अधिक कालावधी लावल्याचेही समोर आले आहे. रिफंडमध्ये उशिर होण्याचे प्रकरण टाटा समुहाकडून एअर इंडियाचे अधिग्रहण होण्यापूर्वीचे आहे. एअर इंडियाशिवाय फ्रंन्टिअर, टीएपी पोर्तुगाल, एअरो मेक्सिको, ईआय एआय आणि एविएंका एअरलाईन्सलाही अमेरिकन सरकारने दंड ठोठावला आहे.