Lokmat Money > बिझनेस न्यूज > अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन

अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन

Anil Ambani Reliance Power : शुक्रवारी बाजार उघडताच अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. बीएसईवर रिलायन्स पॉवरचा शेअर ५ टक्क्यांनी घसरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 12:50 PM2024-11-08T12:50:16+5:302024-11-08T12:50:16+5:30

Anil Ambani Reliance Power : शुक्रवारी बाजार उघडताच अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. बीएसईवर रिलायन्स पॉवरचा शेअर ५ टक्क्यांनी घसरला.

Big blow to Anil Ambani Reliance Power shares fall The 3 year ban increased the tension | अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन

अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन

Anil Ambani Reliance Power : शुक्रवारी बाजार उघडताच अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. बीएसईवर रिलायन्स पॉवरचा शेअर ५ टक्क्यांनी घसरून ४१.४७ रुपयांवर आला आहे. अनिल अंबानी यांच्या कंपन्यांना एका बातमीमुळे शेअरमध्ये मोठी घसरण झाल्याचं म्हटलं जातंय. सार्वजनिक क्षेत्रातील सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं (एसईसीआय) रिलायन्स पॉवर लिमिटेड, त्याच्या उपकंपन्या आणि रिलायन्स एनयू बीईएसएस लिमिटेडवर कंपनीनं जारी केलेल्या निविदांमध्ये भाग घेण्यावर तीन वर्षांची बंदी घातली आहे.

यामुळे सरकारी कंपनीनं बंदी घातली

सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं (एसईसीआय) जूनमध्ये निविदा प्रसिद्ध केली होती, या निविदेत अनिल अंबानी यांच्या कंपन्यांनी कथित बनावट कागदपत्रं सादर केल्याचं समोर आलं होतं. यानंतर सरकारी कंपनीनं ही बंदी घातली आहे. सोलर एनर्जी कॉर्पोरेशननं या निविदेत १००० मेगावॅट/२००० मेगावॉट स्वतंत्र बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम (बीईएसएस) प्रकल्प उभारण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.

महाराष्ट्र एनर्जी जनरेशन लिमिटेडनं (आता Reliance NU BESS Limited) सादर केलेल्या कागदपत्रांच्या तपासणीत अर्नेस्ट मनी डिपॉझिटचा (EMD) बदल्यात बँक गॅरंटीचं इंडोर्समेंट बनावट असल्याचं आढळलं आहे, असं सौर ऊर्जा महामंडळानं म्हटलं आहे. रिलायन्स पॉवर, त्याच्या उपकंपन्या आणि रिलायन्स एनयू बीईएसएस लिमिटेडवरील बंदी ६ नोव्हेंबर २०२४ पासून लागू झाली आहे.

कर्जमुक्त झालेली कंपनी

त्यांची युनिट रोझा पॉवर सप्लाय कंपनीनं सिंगापूरस्थित कर्जदार व्हर्डे पार्टनर्सचं ४८५ कोटी रुपयांचे कर्ज फेडलं आहे. तसेच रोजा पॉवर ही आता झिरो डेट कंपनी बनली असल्याचं अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवरने नुकतंच सांगितलं होतं.  रोजा पॉवरला झिरो डेटचा दर्जा मिळाला आहे. कंपनीने वर्डे पार्टनर्सचं १३१८ कोटी रुपयांचे संपूर्ण कर्ज फेडलं आहे.

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Big blow to Anil Ambani Reliance Power shares fall The 3 year ban increased the tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.