बजाज फायनान्स लिमिटेडला मोठा झटका बसला आहे. वस्तु व सेवा कर विभागाने कारणे दाखवा नोटीस पाठवली. डीजीजीआयने कंपनीला ३४१ कोटी रुपयांच्या कथित कर चुकवल्या प्रकरणी नोटीस पाठवली. यामुळे कंपनीला ८५० कोटी रुपये द्यावे लागतील. यावर अजूनही आता कंपनीकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.
जीएसटी विभागाने ३ ऑगस्ट रोजी ही नोटीस पाठवली. या नोटीसमध्ये म्हटले आहे की, बजाज फायनान्स लिमिटेडने चुकीच्या पद्धतीने सेवा शुल्काचे व्याज आकारले असल्याचे म्हटले आहे. ३४१ कोटींच्या कथित कर चुकविल्या प्रकरणी कंपनीला १०० टक्के दंड ठोठावण्यात आला. जून २०२२ ते मार्च २०२४ पर्यंत दररोज १६ लाख रुपये दंड आकारण्यात आला. एकूण ही रक्कम ८५० कोटी रुपये असून कंपनीला एकूण १६० पानांची नोटीस पाठवण्यात आली आहे.
Ola Electric IPO : सुस्त लिस्टिंग नंतर ओला इलेक्ट्रिकच्या शेअरमध्ये तेजी; ₹८४ पार पोहोचला शेअर
'केंद्रीय कर नियमांतर्गत सूट मिळविण्यासाठी, बजाज फायनान्सने सेवा शुल्क व्याज आकार म्हणून दाखवले आहे. डीजीजीआयने म्हटले आहे की, प्रक्रिया किंवा सेवा शुल्कावर कर आकारला जातो. तर व्याज आकारणीवर कोणताही कर नाही. बजाज फायनान्स लिमिटेड ही देशातील सर्वात मोठी ग्राहक वित्त NBFC आहे. कंपनीकडे ३.५४ लाख कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
प्रकरण समोर कसं आलं?
ऑगस्ट २०२२ मध्ये केरळमधील कोझिकोड येथील कंपनीच्या रिटेल आउटलेटमध्ये केलेल्या तपासणीनंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. कंपनीला दिलेल्या नोटीसमध्ये बजाज फायनान्सच्या ६५ कार्यालयांतून ग्राहकांना कर्ज देण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यावर ‘अपफ्रंट व्याज’ आकारण्यात आले आहे.
शेअरमध्ये तेजी
आज बीएसईमध्ये कंपनीचे शेअर्स वधारत आहेत. या शेअरने सकाळी ६७०० रुपयांचा इंट्रा-डे उच्चांक गाठला होता. ९.३० मिनिटांच्या सुमारास कंपनीचे शेअर्स १ टक्क्यांहून अधिक वाढीसह व्यवहार करत होते.