Lokmat Money > बिझनेस न्यूज > महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना झटका, एलपीजी सिलिंडर महागला; काय आहे नवी किंमत?

महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना झटका, एलपीजी सिलिंडर महागला; काय आहे नवी किंमत?

वर्षाच्या अखेरचा महिना सुरू होताच महागाईचा आणखी एक मोठा झटका बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 08:29 AM2023-12-01T08:29:50+5:302023-12-01T08:30:15+5:30

वर्षाच्या अखेरचा महिना सुरू होताच महागाईचा आणखी एक मोठा झटका बसला आहे.

big blow to consumers commercial LPG cylinders price increased 1st december What is the new price check now | महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना झटका, एलपीजी सिलिंडर महागला; काय आहे नवी किंमत?

महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना झटका, एलपीजी सिलिंडर महागला; काय आहे नवी किंमत?

LPG Price Hike : वर्षाच्या अखेरचा महिना सुरू होताच महागाईचा आणखी एक मोठा झटका बसला आहे. एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत आजपासून म्हणजेच १ डिसेंबर २०२३ पासून वाढ करण्यात आलीये. महिन्याच्या पहिल्या दिवशीच इंधन कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किमतीत ४१ रुपयांनी (LPG Price Hike) वाढ केली आहे. ही वाढ १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (Commercial LPG price) दरात करण्यात आलीये. नव्या किमतींनुसार, राजधानी दिल्लीत एका सिलिंडरची किंमत आता १७९६.५०० रुपये झाली. दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही.

नवे दर आजपासून लागू
एलपीजी सिलिंडरचे नवे दर IOCL वेबसाइटवर अपडेट करण्यात आले असून बदललेले दर १ डिसेंबरपासून लागू झालेत. उल्लेखनीय आहे की दिवाळीपूर्वी इंधन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १०३ रुपयांनी वाढवली होती आणि १ नोव्हेंबर २०२३ रोजी दिल्लीत त्याची किंमत १८३३ रुपये झाली होती. मात्र १६ नोव्हेंबर रोजी छठ पूर्वी त्यावर दिलासा मिळाला आणि सिलिंडरची किंमत ५० रुपयांनी कमी होऊन १७५५.५० रुपये करण्यात आली होती. मात्र वर्षाअखेरीस पुन्हा एकदा ४१ रुपयांची वाढ करण्यात आली.

काय आहेत नवे दर?
नव्या बदलांनंतर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतींबद्दल सांगायचं तर, दिल्लीत आजपासून १९ किलोचा एलपीजी सिलिंडर किंमत १७५५.५० रुपयांऐवजी १७९६.५० रुपये झाली आहे. तर कोलकात्यात त्याची किंमत १८८५.५० रुपयांवरून १९०८ रुपये करण्यात आली आहे. मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १७२८ रुपयांऐवजी १७४९ रुपये झाली आहे. तर चेन्नईमध्ये सिलिंडर १९४२ रुपयांऐवजी १९६८.५० रुपयांना मिळेल.

Web Title: big blow to consumers commercial LPG cylinders price increased 1st december What is the new price check now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.