Lokmat Money > बिझनेस न्यूज > आयफोन प्रेमींना मोठा झटका! अतिशय महाग असेल iPhone 15, इतकी असू शकते किंमत

आयफोन प्रेमींना मोठा झटका! अतिशय महाग असेल iPhone 15, इतकी असू शकते किंमत

तुम्हीही ॲपलच्या पुढील फोनची किंमत आणि फीचर्स जाणून घेण्यास उत्सुक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आयफोन 15 ची किंमत ऑनलाइन लीक झाल्याचे म्हटले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 02:49 PM2023-01-18T14:49:15+5:302023-01-18T14:50:03+5:30

तुम्हीही ॲपलच्या पुढील फोनची किंमत आणि फीचर्स जाणून घेण्यास उत्सुक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आयफोन 15 ची किंमत ऑनलाइन लीक झाल्याचे म्हटले जात आहे.

Big blow to iPhone lovers iPhone 15 will be very expensive the price may be high technology low technology business | आयफोन प्रेमींना मोठा झटका! अतिशय महाग असेल iPhone 15, इतकी असू शकते किंमत

आयफोन प्रेमींना मोठा झटका! अतिशय महाग असेल iPhone 15, इतकी असू शकते किंमत

जर तुम्हाला आयफोनचे वेड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बहुतेक आयफोन युझर्स त्याच्या नव्या व्हेरिअंटची आतुरतेने वाट पाहत असतात. तुम्हीही ॲपलच्या पुढील फोनची किंमत आणि फीचर्स जाणून घेण्यास उत्सुक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आयफोन 15 ची किंमत ऑनलाइन लीक झाल्याचे म्हटले जात आहे. फोर्ब्सच्या एका रिपोर्टनुसार iPhone 15 आणि iPhone 15 Pro मॉडेलच्या किंमतीमध्ये मोठा फरक असू शकतो.

अहवालात मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवरील एका अज्ञात सोर्सचा हवाला देण्यात आला आहे. ज्यात Apple या वर्षी आयफोन 15 प्रो सीरिजच्या किंमती वाढवेल असे म्हटले आहे. आयफोन 15 प्रो मॉडेलची किंमत व्हॅनिला व्हेरिएंटपेक्षा $300 जास्त असू शकते. मागील रिपोर्टमध्ये असे समोर आले होते की iPhone 15 ची किंमत कमी केली जाऊ शकते. पण, फोर्ब्सच्या रिपोर्टनंतर आयफोनच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

किंमत वाढू शकते
फोर्ब्सच्या या रिपोर्टनुसार iPhone 15 ची किंमत 799 डॉलर्स असू शकते, तर iPhone 15 Plus ची किंमत 899 डॉलर्स असू शकते. त्याचप्रमाणे, iPhone 15 Pro ची किंमत 1,099 डॉलर्सपासून सुरू होऊ शकते आणि iPhone 15 Ultra ची किंमत 1,199 डॉलर्स पासून सुरू होऊ शकते. ॲपलच्या या निर्णयामुळे सध्याच्या iPhone 14 आणि iPhone 14 Plus मॉडेलच्या मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यानंतर iPhone 15 आणि iPhone 15 Plus च्या विक्रीला चालना मिळेल असे म्हटले जाते. ज्यांनी फोनच्या किंमती कमी होतील असे म्हटले होते त्या विश्लेषकांसाठी हे क्लासिक काऊंटर असल्याचेही रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

असू शकते 48MP वाईड लेन्सअसे म्हटले जात आहे की कंपनी iPhone 15 आणि iPhone 15 Plus साठी कॅमेरा अपग्रेड करण्याचा विचार करत आहे. रिपोर्टनुसार, iPhone 15 आणि iPhone 15 Plus मध्ये देखील तेच कॅमेरा सेन्सर असू शकतात जे iPhone 14 Pro मॉडेलमध्ये आले होते. हा रिपोर्ट खरा ठरल्यास iPhone 15 आणि iPhone 15 Plus मध्ये 48MP वाइड लेन्ससह ट्रिपल-स्टॅक बॅक कॅमेरा असू शकतो. शिवाय, अहवालात असेही म्हटले आहे की iPhone 15 मॉडेल्स ऑप्टिकल झूम किंवा LiDAR स्कॅनरसाठी टेलिफोटो लेन्ससह येऊ शकत नाहीत.

Web Title: Big blow to iPhone lovers iPhone 15 will be very expensive the price may be high technology low technology business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Apple Incअॅपल