Mahindra & Mahindra : देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राला मोठा झटका बसला आहे. कंपनीला त्यांच्या दुचाकी व्यवसायाच्या संदर्भात इनपुट टॅक्स क्रेडिट दावे आणि जीएसटीपूर्व क्रेडिट बॅलेन्स GST प्रणालीमध्ये आणल्याबद्दल 4.12 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कंपनीनेच शुक्रवारी ही माहिती दिली.
महिंद्रा टू-व्हीलर्स लिमिटेडच्या (MTWL) व्यवसायासंदर्भात मध्य प्रदेशातील इंदूर उपायुक्त कार्यालयातून कंपनीला 4,11,50,120 रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश देण्यात आल्याचे कंपनीने शेअर मार्केटला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. हा व्यवसाय MTWL पासून वेगळा झाला असून, M&M मध्ये विलीन झाला आहे.
दंड आकारण्याचे एक कारण असे आहे की, एमटीडब्ल्यूएलने ज्या इन्व्हॉइसेसच्या आधारे इनपुट टॅक्स क्रेडिट दावा केला आहे, त्यांचा विक्रेत्यांद्वारे GST रिटर्नमध्ये अहवाल दिला गेला नाही आणि त्यामुळे ते ऑटो पॉप्युलेट GSTR-2A मध्ये दिसत नाहीत. शिवाय, दंडाचे आणखी एक कारण म्हणजे, पूर्व क्रेडिट शिल्लक जीएसटी प्रणालीमध्ये आणण्याची परवानगी नाही.