नवी दिल्लीः कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे शेअर बाजार पुरता कोलमडला आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरच्या तुलनेत रुपयाही कमकुवत होत चालला असल्यानं सोन्याचे भावही उतरले आहेत. मागील 10 दिवसांत सोन्याच्या दरात 5 हजार रुपयांची घसरण नोंदवली गेली असून, सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमसाठी 39 हजार 661 रुपये एवढे झाले आहेत. 10 ग्रॅम सोन्याचे दर 1949 रुपयांनी घसरले असून, 39,661 रुपयांवर आले आहेत. तर चांदीचा दर प्रति किलो 6445 रुपयांनी घसरला. सोमवारी दिल्लीत सोने 455 रुपयांनी वाढून 41,610 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते. चांदी मात्र 1,283 रुपयांनी घसरून 40,304 रुपये किलो झाली. शुक्रवारी सोन्याचे दर 10 ग्रॅम 42017 रुपयांवर बंद झाले होते.
सोन्या-चांदीसारख्या मौल्यवान धातूंचा व्यापार केवळ सराफा बाजारातून होत असतो. सोन्याची दोन प्रकारे खरेदी केली जाते. सामान्य लोक सराफा बाजारातून सोन्याची खरेदी करतात. त्याचबरोबर व्यावसायिक लोक हे वायदा बाजारातून सोन्याची खरेदी करतात. कोरोनाचा प्रभाव सोन्याच्या भावावर सर्वाधिक पडला आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे सोने अन् चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे.
13 मार्चलाही सोन्याच्या भावात 2600 रुपयांची घसरण झाली होती. सोन्याचा भाव 41,556.00 रुपयांवर आला होता. तर चांदीच्या दरातही घसरण नोंदवली गेली होती. सोन्याचे दर उतरल्यानं ग्राहकांची सोने खरेदीसाठी झुंबड उडाली असून, अनेक सोन्याच्या दुकानांत मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
BIG Breaking: सोन्याच्या दरात मोठी घसरण; 10 ग्रॅम सोने आता 39 हजार 661 रुपयांत
मागील 10 दिवसांत सोन्याच्या दरात 5 हजार रुपयांची घसरण नोंदवली गेली असून, सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमसाठी 39 हजार 661 रुपये एवढे झाले आहेत. 10 ग्रॅम सोन्याचे दर 1949 रुपयांनी घसरले असून, 39,661 रुपयांवर आले आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 10:01 AM2020-03-17T10:01:03+5:302020-03-17T10:47:29+5:30
मागील 10 दिवसांत सोन्याच्या दरात 5 हजार रुपयांची घसरण नोंदवली गेली असून, सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमसाठी 39 हजार 661 रुपये एवढे झाले आहेत. 10 ग्रॅम सोन्याचे दर 1949 रुपयांनी घसरले असून, 39,661 रुपयांवर आले आहेत.
Highlightsकोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे शेअर बाजार पुरता कोलमडला आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरच्या तुलनेत रुपयाही कमकुवत होत चालला असल्यानं सोन्याचे भावही उतरले आहेत.मागील 10 दिवसांत सोन्याच्या दरात 5 हजार रुपयांची घसरण नोंदवली गेली असून, सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमसाठी 39 हजार 661 रुपये एवढे झाले आहेत. 10 ग्रॅम सोन्याचे दर 1949 रुपयांनी घसरले असून, 39,661 रुपयांवर आले आहेत. तर चांदीचा दर प्रति किलो 6445 रुपयांनी घसरला.