Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्सची मोठी उसळी

सेन्सेक्सची मोठी उसळी

जपानच्या केंद्रीय बँकेने नकारात्मक व्याजदर धोरण स्वीकारल्यामुळे जागतिक बाजारात निर्माण झालेल्या उसळीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारांतही शुक्रवारी जोरदार उसळी

By admin | Published: January 30, 2016 03:37 AM2016-01-30T03:37:52+5:302016-01-30T03:37:52+5:30

जपानच्या केंद्रीय बँकेने नकारात्मक व्याजदर धोरण स्वीकारल्यामुळे जागतिक बाजारात निर्माण झालेल्या उसळीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारांतही शुक्रवारी जोरदार उसळी

Big bucks of the Sensex | सेन्सेक्सची मोठी उसळी

सेन्सेक्सची मोठी उसळी

मुंबई : जपानच्या केंद्रीय बँकेने नकारात्मक व्याजदर धोरण स्वीकारल्यामुळे जागतिक बाजारात निर्माण झालेल्या उसळीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारांतही शुक्रवारी जोरदार उसळी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४0१ अंकांनी वाढून २४,८७0.६९ अंकांवर बंद झाला. विशेष म्हणजे हा आठवडा लाभासह बंद झाला. २0१६ मधील हा पहिला लाभदायी आठवडा ठरला आहे. आशियाई बाजारात तसेच युरोपीय बाजारांतही तेजीचे वातावरण दिसून आले.
या आठवड्यात सेन्सेक्सने ४३५.0३ अंकांची अथवा १.७८ टक्क्यांची वाढ मिळविली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आठवड्यात १४१.१0 अंकांनी अथवा १.९0 टक्क्यांनी वाढला आहे. जपानसह अन्य आशियाई बाजारातील तेजीचा लाभ बाजारांना मिळाल्याचे ब्रोकरांच्या वतीने सांगण्यात आले.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स नरमाईने २४,३४७.३१ अंकांवर उघडला होता. त्यानंतर मात्र तो लवकरच तेजीत आला. एका क्षणी तो २४,९११.९0 अंकांवर गेला होता. हा सेन्सेक्सचा इंट्रा-डे सर्वोच्च बिंदू ठरला. त्यानंतर तो थोडासा खाली येऊन सत्राअखेरीस ४0१.१२ अंकांच्या अथवा १.६४ टक्क्यांच्या वाढीसह २४,८७0.६९ अंकांवर बंद झाला. काल सेन्सेक्स २२.८२ अंकांनी घसरला होता.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १३८.९0 अंकांनी अथवा १.८७ टक्क्यांनी वाढून ७,५६३.५५ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील कोल इंडियाचा समभाग सर्वाधिक ४.७३ टक्क्यांनी वाढला. हीरो मोटोकॉर्प, सन फार्मा, हिंदुस्तान युनिलिव्हर, डॉ. रेड्डीज लॅब आणि बजाज आॅटो यांचे समभाग वाढले. सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३0 पैकी २५ कंपन्यांचे समभाग वाढले. ५ कंपन्यांचे समभाग
घसरले.
घसरलेल्या कंपन्यांत एसबीआय, टाटा स्टील, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल यांचा समावेश आहे.
क्षेत्रनिहाय पातळीवर कंझ्युमर ड्युरेबल्स निर्देशांक सर्वाधिक ३.२६ टक्क्यांनी वाढला. त्या खालोखाल हेल्थकेअर, आयटी, टेक, कॅपिटल गुडस्, आॅटो आणि मेटल या क्षेत्रातील निर्देशांक वाढले.
व्यापक बाजारातही तेजी दिसून आली. बीएसई मीडकॅप २.0२ टक्क्यांनी, तर स्मॉलकॅप १.0७ टक्क्यांनी वाढला. तत्पूर्वी, गुरुवारी विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ९६१.८२ कोटींचे समभाग विकले. (वृत्तसंस्था)

Web Title: Big bucks of the Sensex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.