Join us

रेखा झुनझुनवाला यांनी केली मोठी डील, ७४० कोटींना खरेदी केली ऑफिस स्पेस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 9:39 AM

दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांनी मोठा करार केला आहे.

दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) यांनी मोठा करार केला आहे. रेखा झुनझुनवाला यांच्या फर्म Kinnteisto LLP ने सुमारे ७४० कोटी रुपयांना कमर्शिअल ऑफिसची जागा खरेदी केली आहे. झुनझुनवाला यांच्या फर्मनं देशातील सर्वात महागडं कमर्शिअल डिस्ट्रिक्ट वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) आणि चांदिवली परिसरात १.९४ लाख चौरस फुटांपेक्षा अधिक ऑफिस जागा खरेदी केली आहे. मनीकंट्रोलच्या एका रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. रेखा झुनझुनवाला या शेअर बाजारातील 'बिग बुल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी आहेत. राकेश झुनझुनवाला यांचे १४ ऑगस्ट २०२२ रोजी निधन झालं.चांदिवलीत ६८ हजार स्क्वेअर फुटची जागाहा करार अलिकडच्या वर्षांतील सर्वात मोठ्या व्यावसायिक करारांपैकी एक आहे. रेखा झुनझुनवाला यांच्या कंपनीनं चांदिवली परिसरात कनाकिया रियल्टी प्रायव्हेट लिमिटेडकडून कार्यालयासाठी जागा खरेदी केलीये. कनाकिया स्पेसेसनं १३७.९९ कोटी रुपयांना ६८१९५ चौरस फूट कार्पेट क्षेत्राची विक्री केली. या करारामध्ये बूमरँग इमारतीतील ११० कार पार्किंग स्लॉट्सचाही समावेश आहे.बीकेसीमध्येही जागाजर बीकेसीबद्दल (BMC) बोलायचं झालं तर रेखा झुनझुनवाला यांच्या फर्मने द कॅपिटल नावाच्या इमारतीत चार मजल्यांमध्ये सुमारे १.२६ लाख चौरस फूट बिल्ट-अप क्षेत्र विकत घेतलं आहे. बीकेसीमध्ये झालेला हा करार सुमारे ६०१ कोटी रुपयांचा आहे आणि या डीलमध्ये १२४ कार पार्किंग स्लॉट्सचाही समावेश आहे.नव्या कॉर्पोरेट शेअरहोल्डिंगनुसार, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे २५ कंपन्यांचे शेअर्स आहेत, ज्यांचं मूल्य ३५६८७.६ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

टॅग्स :राकेश झुनझुनवालामुंबई