विमान उद्योगाशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राकेश झुनझुनवाला यांची विमान कंपनी अकासा एअर पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्टपासून उड्डाणास सज्ज झाली आहे. यासाठी कंपनीनं बुकिंगही सुरू केले आहे. कंपनीने शुक्रवारी यासंदर्भातील माहिती दिली आहे. बोईंग 737 MAX विमानाचा वापर करून 7 ऑगस्ट रोजी मुंबई-अहमदाबाद मार्गावर आपले पहिले व्यावसायिक उड्डाण सुरू करणार असल्याची माहिती अकासा एअरने दिली.
28 साप्ताहिक उड्डाणांसाठी तिकीट विक्री सुरू केली आहे. ७ ऑगस्टपासून ते मुंबई-अहमदाबाद या मार्गावर विमानचं उड्डाण केले जाणार आहे. तर 13 ऑगस्टपासून बेंगळुरू-कोची मार्गावर 28 साप्ताहिक उड्डाणे चालवली जातील असे कंपनीने सांगितले.
कायम्हटलेयकंपनीने?कंपनी दोन 737 MAX विमानांसह व्यावसायिक उड्डाणे सुरू करणार आहे. बोईंगने एक MAX विमान कंपनीला दिले आहे आणि दुसऱ्या विमानाची डिलिव्हरी या महिन्याच्या अखेरीस होणार आहे. "आम्ही मुंबई आणि अहमदाबाद दरम्यानच्या फ्लाइट्ससह नवीन बोईंग 737 MAX विमानाने ऑपरेशन सुरू करत आहोत. आम्ही आमचे नेटवर्क टप्प्याटप्प्याने वाढवू. आम्ही आणखी शहरे जोडू,” अशी माहिती अकासा एअरचे सह-संस्थापक आणि सीईओ प्रवीण अय्यर यांनी दिली. ग्राहकांना प्ले स्टोअरवरून एअरलाईन्सचं अॅप डाऊनलोड करून किंवा akasaair.com वरून तिकीट बुक करू शकता.