Join us

फॉर्म 16मध्ये मोठा बदल, नोकरी करणाऱ्यांवर होणार परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 15:33 IST

आर्थिक वर्ष 2019-20मध्ये इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी अंतिम तारीख 31 जुलै 2019 करण्यात आली आहे.

नवी दिल्लीः आर्थिक वर्ष 2019-20मध्ये इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी अंतिम मुदत 31 जुलै 2019 करण्यात आली आहे. परंतु या वर्षी रिटर्न फाइल करण्याची तारीख वाढण्याची शक्यता आहे. कारण प्रत्यक्ष कर निर्धारण बोर्डा (सीबीडीटी)नं फॉर्म 16 जारी करण्याच्या शेवटच्या तारखेच्या मुदतीत वाढ केली आहे. तसेच वित्त वर्ष 2018-19मध्ये फॉर्म 24Q भरण्याची शेवटची मुदतही वाढवण्यात आली आहे.फॉर्म 16मध्येही बदल करण्यात आला आहे. या नव्या बदलानुसार कर्मचाऱ्यांसंदर्भात अधिक माहिती द्यावी लागणार आहे. प्राप्तिकर विभागानं 2018-19मध्ये फॉर्म 16 जारी करण्याची मुदत कंपन्यांना वाढवून दिली आहे. त्यात 25 दिवसांची वाढ करून ती मुदत 10 जुलै करण्यात आली आहे. त्यामुळे आता 10 जुलैपर्यंत कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना फॉर्म 16 जारी करता येणार आहे.

फॉर्म 16 म्हणजे काय?फॉर्म 16 सर्वात प्रसिद्ध फॉर्म आहे, जर आपण नोकरी करत असाल. फॉर्म 16 हे नियोक्ताद्वारे जारी केलेले प्रमाणपत्र आहे. फॉर्म 16 ही एक प्रकारची आपल्या पगाराच्या जमा-खर्चाची पावती असते, आपला किती टॅक्स कापला जातो तो यात नमूद केलेला असतो. आयकर विभाग फॉर्म 16 हा एक महत्वाचा दस्तावेज आहे, जो आयकर कायदा, 1961च्या तरतुदीनुसार जारी केला जातो. फॉर्म 16मध्ये आपल्याला तयार करण्याची आणि फाइल करण्याची आवश्यकता असलेली माहिती असते. फॉर्म पुढील वर्षी 15 जूनपूर्वी सर्वसाधारणपणे जारी केला जातो. ते ज्या आर्थिक वर्षामध्ये कर कापले जाते ते लगेच चालू होते. 

टॅग्स :इन्कम टॅक्स