Lokmat Money > बिझनेस न्यूज > नोएल येताच TATA ट्रस्‍टमध्ये मोठा बदल! दोन मोठी पदं रद्द; का घेण्यात आला निर्णय? असं आहे कारण

नोएल येताच TATA ट्रस्‍टमध्ये मोठा बदल! दोन मोठी पदं रद्द; का घेण्यात आला निर्णय? असं आहे कारण

latest tata trust drop 2 top post after noel take charge as chairman

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 02:44 PM2024-10-29T14:44:29+5:302024-10-29T14:44:51+5:30

latest tata trust drop 2 top post after noel take charge as chairman

Big change in TATA Trust as soon as Noel comes Canceled two major positions; Why was this big decision taken | नोएल येताच TATA ट्रस्‍टमध्ये मोठा बदल! दोन मोठी पदं रद्द; का घेण्यात आला निर्णय? असं आहे कारण

नोएल येताच TATA ट्रस्‍टमध्ये मोठा बदल! दोन मोठी पदं रद्द; का घेण्यात आला निर्णय? असं आहे कारण

रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूहात मोठ्या प्रमाणावर बदल होताना दिसत आहेत. 11 ऑक्‍टोबरला टाटा ट्रस्‍टच्या चेअरमन पदाची धुरा आपल्या हाती घेतल्यानंतर नोएल टाटा यांनी ट्रस्‍टमधील काही पदे रद्द करण्यास मंजुरी दिली आहे. यापूर्वीही टाटा ट्रस्‍टमध्ये काही बदल झाले होते. आता आलेल्या वृत्तांनुसार ट्रस्टमधील मुख्‍य वित्‍तीय अधिकारी (CFO) और मुख्‍य परिचालन अधिकारी (COO) ही दोन मोठी पदे रद्द करण्यात आली आहेत. आता ट्रस्‍टमध्ये या दोन पदांवर कुणाचीही नियुक्ती केली जाणार नाही.

इकोनॉमिक टाइम्‍सच्या वृत्तानुसार, ट्रस्‍टने खर्चे कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. ट्रस्‍टमध्ये व्यवस्थापन स्थरावर होणारा खर्च कमी करणे हा यामागील उद्देश आहे. टाटा सन्स या होल्डिंग कंपनीत टाटा समूहाचा 66 टक्के एवढा वाटा आहे. यानुसार, ट्रस्‍टचेच टाटा समूहाच्या कंपन्यांवर खरे नियंत्र आहे. 9 ऑक्‍टोबरला रतन टाटा यांचे निधन झाले आणि यानंतर, 11 ऑक्‍टोबरला त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांना सर रतन टाटा ट्रस्‍ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्‍टचे चेअरमन बनवण्यात आले.

का रद्द केली पदं - 
संबंधित वृत्तानुसार, नोएल टाटा अध्यक्ष होण्यापूर्वीच ट्रस्टमध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, तेव्हाच ट्रस्टच्या बोर्डाने त्यास मान्यताही दिली होती. नोएल टाटा चेअरमन झाल्यापासून टाटा सन्स ट्रस्टमध्ये संरचनात्मक बदल सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून, दोन संबंधित मोठी पदे रद्द करण्यात आली. कारण, ट्रस्टला एका अंतर्गत सर्वेक्षणात आणि ऑडिटमध्ये कर्मचारी खर्च 180 कोटी रुपयांपर्यंत वाढल्याचे आढळून आले. तर प्रोजेक्‍टशी संबंधित अतिरिक्‍त खर्चे एकत्रित करून कर्मचाऱ्यांचे बील 400 कोटी रुपयांपर्यंत पोहोचते. हा खर्च कमी करण्यासाठी नवा बदल करण्यात आला आहे.

Web Title: Big change in TATA Trust as soon as Noel comes Canceled two major positions; Why was this big decision taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.